हा आहे वैद्यक जिहादींचा खरा चेहरा !
भारतीय राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने नवीन प्रतीकचिन्ह स्वीकारले असून त्यात आयुर्वेदप्रवर्तक भगवान धन्वन्तरि यांची रंगीत प्रतिमा अंतर्भूत करण्यात आली आहे. यावर ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) सारख्या समाजमाध्यमांवर पाश्चात्त्य वैद्यकांच्या पदवीधरांनी टीकेची राळ उठवली आहे. ‘आय.एम्.ए.’ (इंडियन मेडिकल असोसिएशन) या पाश्चात्त्य वैद्यकांच्या पदवीधरांच्या सगळ्यात मोठ्या खासगी संघटनेने तर हा पालट असंमत असल्याचे पत्र आयोगाला पाठवून दिले आहे. एकीकडे ‘धन्वन्तरि ही आयुर्वेदाची मक्तेदारी नसून आरोग्यदेवता असल्याने ती सगळ्यांनाच लागू आहे’, असे म्हणत आयुर्वेदाची ओळख पुसण्याचा प्रयत्न करायला भारतीयत्वाचा मुखवटा धारण करायचा, तर दुसरीकडे मात्र या प्रत्येक चिन्हाला धर्मांधच नव्हे, तर छद्म विज्ञानाचे प्रतीक म्हणत हिणवत खरा चेहरा दाखवायचा, हे आहे वैद्यक जिहादींचे खरे स्वरूप ! फारच थोडके पाश्चात्त्य वैद्यक पदवीधर या स्वागतार्ह निर्णयाच्या बाजूने समाजमाध्यमांवर बोलत आहेत, हे शोचनीय आहे. जे बोलत आहेत, त्यांचे मनापासून कौतुक.
या स्वागतार्ह निर्णयासाठी भारत सरकारला धन्यवाद ! कोणत्याही दबावाखाली न येता हा निर्णय पालटू नये, ही विनंती ! प्रश्न केवळ आयुर्वेदाचा नसून भारतीय संस्कृती आणि भारतीयत्व यांचा आहे.
– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली. (१.१२.२०२३)
(साभार : फेसबुक)