श्रीरामपूर (अहिल्यानगर) येथे बहिणीच्या मैत्रिणीवर धर्मांधाचा अनेकदा बलात्कार !
श्रीरामपूर (जिल्हा अहिल्यानगर) – येथे रहाणार्या धर्मांधाने एका १८ वर्षांच्या महाविद्यालयीन तरुणीवर अनेकदा बलात्कार केला आहे. ती मैत्रिणीकडे पेपर संच घेण्यासाठी गेली असता मैत्रिणीचा भाऊ आरोपी दानिश मन्सूरी याने पीडित विद्यार्थिनीवर बळजोरी करत तिच्या गळ्यात हात घालून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. त्यानंतर ‘माझे प्रेम आहे’, असे म्हणत बळजोरीने तिच्यावर बलात्कार केला. पीडित तरुणीने घडलेला प्रसंग नातेवाइकांच्या साहाय्याने श्रीरामपूर शहर पोलिसांना सांगितल्याने आरोपी दानिश मन्सूरी याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करून त्याला अटक केली आहे.
आरोपीने विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला. त्याचे छायाचित्र आणि व्हिडिओ काढून ते ‘व्हायरल’ करण्याची धमकी देऊन आरोपीने विद्यार्थिनीवर वारंवार लैंगिक अत्याचार केला. अपकीर्ती होईल या भितीपोटी पीडितेने कुणाला काही सांगितले नाही; मात्र त्रास असह्य झाल्यावर तिने पोलिसात तक्रार केली.
संपादकीय भूमिका :तरुणींनो, मुसलमान युवतींशी मैत्री केल्याचे भयानक परिणाम जाणा ! आणि सतर्क राहून धर्मांधांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! |