एकाही रोहिंग्या किंवा बांगलादेशी घुसखोराला राजस्थानमध्ये राहू देणार नाही ! – बालमुकुंद आचार्य, नवनिर्वाचित आमदार, भाजप
जयपूर – राजस्थान विधानसभा निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर भाजपचे जयपूरमधील हवामहल मतदारसंघातून निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार बालमुकुंद आचार्य यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. त्यामध्ये त्यांनी ‘एकाही रोहिंग्या किंवा बांगलादेशी घुसखोराला राजस्थानमध्ये राहू देणार नाही’, असे म्हटले आहे. आचार्य बालमुकुंद यांनी काँग्रेसचे आर्.आर्. तिवारी यांचा पराभव करून विजय मिळवला आहे.
न्यू राजस्थान में आपका स्वागत है।
हवामहल विधानसभा सीट से चुने गए बालमुकुंद आचार्य।रोहिग्या- बांग्लादेशी तत्काल राजस्थान छोड दे
जय श्रीराम #ElectionResult#BalMukundAcharyapic.twitter.com/I8zuak3ivF
— Adv. Vikas Deo कानून मित्र! जय हिन्द 🇮🇳 ✪ (@vikascreateyug) December 4, 2023
बालमुकुंद आचार्य यांनी अवैध मांसाहाराची दुकाने बंद करण्याचा दिला आदेश !
जयपूरमधील हवामहल मतदारसंघातून नवनिर्वाचित आमदार बालमुकुंद आचार्य यांनी दुसरा एक व्हिडिओ प्रसारित केला असून त्यामध्ये अवैध मांसाहाराची दुकाने बंद करण्याचा आदेश दिला आहे. आमदाराच्या मागणीची कार्यवाही करण्यासाठी पोलिसांनी २ दिवसांचा अवधी मागितला आहे.
राजस्थान: विधायक बनते ही एक्शन में आए बीजेपी नेता बालमुकुन्द आचार्य#Rajasthan #BalmukundAcharya #ElectionResult #balmukundacharya #RajasthanElection2023 #WATCH #VIDEO pic.twitter.com/hd9znBdJyQ
— TheSootr (@TheSootr) December 4, 2023
आचार्य बालमुकुंद यांचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला असून त्यात त्यांनी, ‘माझ्या परिसरात बेकायदेशीर मांसाहाराची दुकाने चालू देणार नाही’, अशी घोषणा केली आहे.