Erdogan Israel : (म्हणे) ‘युद्धानंतर इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्यावर खटला प्रविष्ट करा !’ – तुर्कीयेचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन
तुर्कीयेचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी पुन्हा केले हमासचे समर्थन !
अंकारा (तुर्कीये) – तुर्कीयेचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी पुन्हा एकदा आतंकवादी संघटना हमासचे समर्थन केले आहे. त्यांनी म्हटले की, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे युद्धाचे गुन्हेगार आहेत. इस्रायल आणि हमास यांच्यामधील युद्ध संपल्यानंतर नेतान्याहू यांच्यावर युद्धाच्या गुन्ह्यांचा खटला चालवला पाहिजे. इस्तंबूलमधील इस्लामी सहकार्य संघटना या मुसलमान देशांच्या संघटनेच्या बैठकीत एर्दोगन यांनी वरील वक्तव्ये केली.
सौजन्य स्काय न्यूज
एर्दोगन पुढे म्हणाले की,
१. नेतान्याहू ‘कसाई’ असून त्यांनी नरसंहार केल्याने ते गुन्हेगार आहेत.
२. गाझामधील निरपराध लोकांच्या हत्येसाठी इस्रायल दोषी असून त्याला मानवतेवर वाटाघाटी करण्याचा अधिकार नाही.
३. तुर्कीयेने यापूर्वीही पॅलेस्टाईन आणि गाझा यांना साहाय्य केले आहे अन् भविष्यातही आम्ही असेच साहाय्य करू. इस्लामी देशांनी यासंदर्भात कठोर भूमिका घेतली पाहिजे.
४. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे सदस्य देश म्हणजेच ब्रिटन, चीन, फ्रान्स, रशिया आणि अमेरिका दुटप्पी भूमिका घेत आहेत. सध्या सुरक्षा परिषदेच्या रचनेमुळे कुठेही शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही आणि अशी अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत.
५. एर्दोगन यांनी गेल्या महिन्यात इस्रायल-हमास युद्ध चालू झाल्यानंतर म्हटले होते की, हमास ही आतंकवादी संघटना नाही. त्याचे सदस्य ‘मुजाहिदीन’ (इस्लाम धर्मासाठी जिहाद करणारे लोक) आहेत. ते आपली भूमी आणि नागरिक वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.
संपादकीय भूमिकातुर्कीये आणि तिचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांच्याकडून ‘काश्मीरवर मुसलमानांचाच अधिकार आहे’, असे सांगून तेथे चालू असलेल्या जिहादी आतंकवादी कारवायांचे समर्थन केले जाते. त्यामुळे एर्दोगन यांनी हमासला पाठिंबा दिल्यास काय आश्चर्य ? |