‘चंद्रयान-३’ मोहिमेसाठी चंद्राकडे पाठवलेले प्रोपल्शन मॉड्यूल पृथ्वीपर्यंत परत आणण्यास इस्रोला मिळाले यश !
यामुळे अंतराळविरांना चंद्रावर पाठवल्यावर त्यांना परत आणणे सोपे होणार !
(प्रोपल्शन मॉड्यूल हे अंतराळयानाचे प्राथमिक ‘वर्कहॉर्स’ आहे. जिओस्टेशनरी ट्रान्सफर ऑर्बिट (जीटीओ) मधून लँडरला चंद्राच्या कक्षेत पोचवणे आणि लँडर वेगळे करणे, हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.)
बेंगळुरू (कर्नाटक) – ‘चंद्रयान-३’चे ‘प्रोपल्शन मॉड्यूल’ चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या कक्षेत परत आणण्यात आमच्या वैज्ञानिकांना यश मिळाले आहे, अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने म्हणजे इस्रोने दिली आहे. सध्या ‘प्रोपल्शन मॉड्यूल’ पृथ्वीची प्रदक्षिणा घालत आहे.
सौजन्य एएनआय न्यूज
इस्रोने म्हटले आहे की, आता चंद्रावरून पृथ्वीवर परतण्याची प्रक्रिया सोपी असणार आहे. आम्ही आता अशा प्रकारच्या मोहिमांवर काम करत आहोत. यासाठी एक सॉफ्टवेअर बनवले जात आहे. चंद्रयान मोहीम पूर्ण करून ‘चंद्रयान-३’चे प्रोपल्शन मॉड्यूल आता पृथ्वीच्या कक्षेत परतले आहे. हे केवळ चंद्रयान मोहिमेसाठीचे मर्यादित यश नव्हे, तर कोणतेही यान अथवा अंतराळवीर यांना अवकाश मोहीम पूर्ण करून पृथ्वीवर परत आणण्याची क्षमता सिद्ध करणारी कामगिरी आहे. त्यामुळे आता अंतराळात किंवा चंद्रावर अंतराळविरास पाठवून सुखरूप परत पृथ्वीवर आणणे शक्य होईल.