जपानमध्ये मुलांच्या विचित्र नावांच्या विरोधात सरकार करणार कायदा !
टोकियो (जपान) – जपानमधील आई-वडिलांमध्ये मुलांची आगळीवेगळी, प्रसंगी विचित्र नावे ठेवण्याची पद्धत रूढ झाली आहे. याचे कारण असे की, तेथे मुलांवर स्वतंत्र ओळख निर्माण करून स्वतःच्या पायावर उभे रहाण्याचा दबाव असतो. गेल्या ४ दशकांत हा प्रकार वेगाने वाढला; परंतु त्यामुळे मुलांना सामाजिक आणि व्यावहारिक आव्हानांना तोंड द्यावे लागले. ‘यामुळे सरकार पालकांना अपारंपरिक नावे देण्यास रोखणार असून त्यासाठी एक कायदाच बनवण्यात येईल’, असे सरकारने घोषित केले आहे. ‘असामान्य स्वरूपाची नावे कायद्याने नियंत्रित असली पाहिजेत’, असे मत ८० टक्के जपानींनी व्यक्त केले आहे. विधी सल्लागार संस्था ‘बेंगोफोर डॉट कॉम’च्या पाहणीतून हा दावा करण्यात आला.
संपादकीय भूमिकाभारतातही सध्या मुलांची अर्थहीन नावे ठेवण्याची ‘फॅशन’ रूढ होत आहे. अध्यात्मशास्त्रानुसार शब्द,स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांची शक्ती एकत्रित असते. त्यामुळे मुलांची सात्त्विक आणि देवांची नावे ठेवल्यास मुलांना त्याचा लाभ होतो. पालकांनी मुलांची नावे ठेवतांना हे शास्त्र समजून घेणे आवश्यक ! |