जगभरात ‘इंटरनेट’ वापरणार्यांचे प्रचंड वाढते प्रमाण !
आतापर्यंत अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत आवश्यकता समजल्या जात होत्या; परंतु आता ‘यांपैकी एखादी गोष्ट नसली, तरी चालेल; पण इंटरनेट हवेच’, अशी स्थिती निर्माण झाली आहे. माफक आणि सहज उपलब्ध असलेल्या ‘इंटरनेट डेटा’मुळे अनेकांचा दिवसभरातील बराच वेळ इंटरनेटचा वापर करण्यात जात असतो. जगभरात ‘इंटरनेट डेटा’चा वापर आणि त्यासाठी व्यय होत असलेला वेळ यांविषयीची माहिती पुढे आली आहे. ती येथे देत आहोत.
१. जगातील ८०६ कोटींपैकी ५३० कोटी लोकांकडून इंटरनेटचा वापर
जगाची लोकसंख्या ८०६ कोटी आहे. त्यांपैकी भ्रमणभाष संच वापरकर्ते ५६० कोटी आहेत. त्यातील ५३० कोटी लोक इंटरनेट वापरतात, तसेच ४९५ कोटी लोक सामाजिक माध्यमांचा (‘सोशल मिडिया’चा) वापर करतात, असे दिसून आले आहे.
३. वयोगटानुसार इंटरनेटचा होणारा वापर
वर्ष १६ ते २४ वर्षे वयोगटातील ७.३६ टक्के महिला आणि ७.१० टक्के पुरुष इंटरनेटचा वापर करतात, तसेच २५ ते ३४ वर्षे वयोगटातील ७.५ टक्के महिला अन् पुरुष ७.२ टक्के, ३५ ते ४४ वर्षे वयोगटातील ६.३२ टक्के महिला आणि ६.३८ टक्के पुरुष, त्यानंतर ४५ ते ५४ वर्षे वयोगटातील ६.११ टक्के महिला अन् पुरुष ६.८ टक्के, तर ५५ ते ६४ वर्षे वयोगटातील ५.१४ टक्के महिला आणि ५.२२ टक्के पुरुष इंटरनेटचा वापर करतात.
४. कोणत्या देशात किती घंटे इंटरनेटचा वापर होतो ?
दक्षिण आफ्रिकेमध्ये ९.२९ घंटे इंटरनेट वापरले जाते. रशियामध्ये ८.१४ घंटे, यूएईमध्ये ७.३४ घंटे, इस्रायलमध्ये ७.३१ घंटे, तर अमेरिकेमध्ये ७.१ घंटे इंटरनेटचा वापर होतो. ऑस्ट्रेलियामध्ये ६.२४ घंटे इंटरनेटचा वापर होतो. या देशांच्या तुलनेत भारतही मागे नसून भारतात ६.४१ घंटे इंटरनेट वापरले जाते.