प्रखर हिंदुत्वनिष्ठ टी. राजा सिंह यांचा हिंदु जनजागृती समितीकडून सत्कार !
भाग्यनगर (तेलंगाणा) – येथील गोशामहल मतदार संघातील भाजपचे उमेदवार म्हणून प्रखर हिंदुत्वनिष्ठ टी. राजा सिंह ८० सहस्रांहून अधिक मते मिळाली आहेत. टी. राजा सिंह येथून तिसर्यांदा विजयी झाले आहेत. हिंदु जनजागृती समितीकडून तेलंगाणा राज्य समन्वयक श्री. चेतन गाडी यांनी टी. राजा सिंह यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. या वेळी अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.
यासंदर्भात ‘सनातन प्रभात’नेही त्याच्या अधिकृत ‘एक्स’ खात्यावरून ३ डिसेंबरच्या सायंकाळी टी. राजा सिंह यांचे अभिनंदन केले. ‘तेलंगाणाच्या अत्यंत प्रतिकूल वातावरणातही प्रखर हिंदुत्वनिष्ठ नेते आणि भाजपचे उमेदवार टी. राजा सिंह हे पुन्हा एकदा विजयी झाले आहेत. त्यांना ८० सहस्र १८२ मते मिळाली असून बी.आर्.एस्. च्या उमेदवाराला ५८ सहस्र ७२५ मते, तर काँग्रेसच्या उमेदवाराला केवळ ६ सहस्र २६५ मतांवर समाधान मानावे लागले. राजा भैय्या यांचे अभिनंदन !’, असे ट्वीटमध्ये लिहिण्यात आले आहे.
Amidst all odds under the skies of Telangana,
Devout Hindu Leader and #BJP4Telangana candidate @TigerRajaSingh ji has yet again emerged victorious in #TelanganaElections.
He won 80,182 votes with BRS candidate, a distant second with just 21,457 votes. #Congress could gather… pic.twitter.com/vYMZK2Z0JY
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 3, 2023