Navy Day : नौदलातील पदांची नावे भारतीय परंपरांनुसार करणार ! – पंतप्रधान मोदी यांची घोषणा

नौदलाच्या गणवेशावर शिवरायांची राजमुद्रा असणार !

मालवण – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मार्गदर्शनात नौदलातील पदांची नावे पालटून ती भारतीय परंपरेनुसार करण्यात येणार असल्याची घोषणा केली. गेल्या वर्षी नौदलाच्या ध्वजावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेला स्थान देण्यात आले होते. आता त्यांनी नौदलाच्या गणवेशावरही या राजमुद्रेला स्थान देण्यात येणार आहे, अशी घोषणा पंतप्रधानांनी केली.

भारतीय नौदलातील अधिकारी पदांची सध्याची ब्रिटीशकालीन पद्धत !

भारतीय नौदलात सध्या ब्रिटीश पद्धतीनुसार पुढील प्रकारे पदे देण्यात येतात : अ‍ॅडमिरल, व्हाईस अ‍ॅडमिरल, रिअर अ‍ॅडमिरल, कोमोदोर, कॅप्टन, कमांडर, लेफ्टनंट कमांडर, लेफ्टनंट आदी.

संपादकीय भूमिका 

आता यावरून कथित धर्मनिरपेक्षतावादी राजकीय पक्ष, साम्यवादी आणि  पुरो(अधो)गामी कंपूने भारतीय नौदलाचे भगवेकरण होत असल्याची आवई उठवण्यास आरंभ केला, तर आश्‍चर्य वाटू नये !