Shivaji Maharaj : पंतप्रधानांच्या हस्ते राजकोट येथे शिवछत्रपतींच्या भव्य पुतळ्याचे अनावरण !
मालवण – भारतीय नौदल दिनाच्या औचित्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ४ डिसेंबरच्या दुपारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन झाले. मालवण येथील समुद्रकिनार्यावर असलेल्या राजकोट या ठिकाणी नव्याने उभारण्यात आलेल्या ४५ फूट उंचीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, महाराष्ट्राचे राज्यपाल तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नौदल प्रमुख अॅडमिरल आर्. हरि कुमार आदी उपस्थित होते. या ठिकाणी शिवकालीन दालनाची निर्मिती करण्यात आली आहे. याची पहाणी पंतप्रधान मोदी यांच्यासह मान्यवरांनी केली. त्यानंतर सर्वजण तारकर्ली येथे रवाना झाले.
सौजन्य : एएनआय न्यूज