#BoycottSunburnFestival Goa : जैवविविधतेला हानी पोचवणार्‍या ‘सनबर्न’ला अनुमती देऊ नका !

हणजूण-कायसुव जैवविविधता व्यवस्थापन समितीची मागणी

‘सनबर्न’ महोत्सवाला हणजूण-कायसुव जैवविविधता व्यवस्थापन समितीचा विरोध

हणजूण (गोवा) : वागातोर येथे होऊ घातलेल्या आणि जैवविविधतेला हानी पोचवणार्‍या ‘सनबर्न’ महोत्सवाला अनुमती देऊ नये, अशी मागणी हणजूण-कायसुव जैवविविधता व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश नाईक यांनी केली आहे. समितीने या आशयाचे निवेदन पर्यटक संचालक, उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक आणि पंचायत यांना दिले आहे.

समितीच्या मते महोत्सवाच्या आयोजनासाठी डोंगरमाथ्यावरील झाडे तोडल्याने जैवविविधतेचा मोठ्या प्रमाणात र्‍हास होतो. महोत्सवानंतर या ठिकाणी कचर्‍याचा ढीग पडलेला असतो. महोत्सव परिसरात रस्त्यांवर वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असल्याने सामान्य जनतेला वेठीस धरले जाते. महोत्सवाच्या आयोजनामुळे येथील जनतेच्या जीवनावर विपरीत परिणाम होतो. या कारणांसाठी महोत्सवाला अनुमती देऊ नये.

(सौजन्य : RDXGOA GOA NEWS)