मीरा-भाईंदर येथील दुकानांवरील अमराठी नामफलकांना मनसेने काळे फासले !
ठाणे, ३ डिसेंबर (वार्ता.) – मीरा-भाईंदर येथील दुकानदारांनी मराठीऐवजी अन्य भाषेत लावलेल्या नामफलकांना २ डिसेंबर या दिवशी मनसेने काळे फासले. या प्रकरणी पोलिसांनी मनसेच्या पदाधिकार्यांना नोटिसा बजावल्या आहेत, तर दुसरीकडे २४ घंट्यांत मराठीत नामफलक केले नाहीत, तर आंदोलन चालूच राहील, अशी चेतावणी मनसेने दिली होती.
मनसेचे शहर अध्यक्ष हेमंत सावंत, मनसेचे मीरा-भाईंदर विधानसभा अध्यक्ष सचिन पोपळे आणि महिला विधानसभा अध्यक्षा निता घरत यांसह अन्य कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले.