कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वाहनचालकावर आक्रमण केल्याप्रकरणी ४ धर्मांधांना अटक
ठाणे, २ डिसेंबर (वार्ता.) – कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे वाहनचालक असलेले लकेश्री यांच्यावर विभागीय कार्यालयाजवळील खोजा जमादखाना प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर धारदार चाकूने वार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी कमरूद्दीन ईस्माईल शेख (वय २५ वर्षे), अरबाज वहाब सय्यद (वय २६ वर्षे), इस्राईल मोहिद्दीन शहा (वय ३० वर्षे) आणि शाहरूख मो. फझरूद्दीन शेख (वय २२ वर्षे) या घाटकोपर येथे रहाणार्या आरोपींना अटक केली आहे. या सर्व आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. (गुन्हेगारांना कठोर शिक्षा न मिळाल्यामुळे ते गुन्हेगारच रहातात ! – संपादक)
संपादकीय भूमिका :अल्पसंख्यांक धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्यांक ! |