माझ्या घरावर आक्रमण करण्यासाठी १० जन्म घ्यावे लागतील ! – बबनराव लोणीकर, माजी मंत्री
जालना – माजी मंत्री तथा भाजपचे नेते बबनराव लोणीकर यांच्या घरावर अज्ञात लोकांनी आक्रमण केल्याची घटना घडली आहे. अचानक आलेल्या अज्ञातांच्या घोळक्याने बबनराव लोणीकर आणि त्यांचे बंधू यांच्या घरावर दगडफेक केली. माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी घरावरील आक्रमणाचे वृत्त फेटाळून लावले आहे. ते म्हणाले, ‘‘माझ्या घरावर आक्रमण करण्यासाठी विरोधकांना १० जन्म घ्यावे लागतील.’’
Babanrao Lonikar Vs Rajesh Tope : माझ्या घरावर दगडफेक झाली नाही’ आमदार बबनराव लोणीकर यांचा खुलासाhttps://t.co/fjtnDCHarc#babanraolonikar #rajeshtope #lokshahimarathi
— Lokshahi Marathi (@LokshahiMarathi) December 2, 2023