जालना येथे टोळक्याकडून राजेश टोपे यांच्या वाहनाची तोडफोड !
जालना – जालना येथे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे यांच्या चारचाकी वाहनावर २ डिसेंबर या दिवशी अज्ञातांनी आक्रमण केले. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खाली उभी असलेल्या गाडीत टोपे यांचा केवळ चालक होता. तो थोडक्यात वाचला. आक्रमणकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. पोलीस सीसीटीव्हीची पहाणी करून दगडफेक करणार्यांचा शोध घेत आहेत. राजेश टोपे यांनी याविषयी तीव्र शब्दांत खेद व्यक्त केला. ते म्हणाले की, असंतुष्ट लोकांनी हे कृत्य केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी योग्य ती कारवाई केली पाहिजे. ज्या लोकांनी कायदा हातात घेतला असेल, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.