Shri Krishna Janmabhoomi : श्रीकृष्णजन्मभूमीच्या मुक्तीसाठी न्यायालयात याचिका करणारे सत्यम पंडित यांना ठार मारण्याची धमकी
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाकडून देण्यात आली आहे धमकी !
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथील श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही इदगाह मशीद हटवण्याच्या संदर्भात न्यायालयात याचिका प्रविष्ट करणारे सत्यम पंडित यांना बंदी घालण्यात आलेल्या जिहादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने ठार मारण्याची धमकी दिली आहे. पंडित यांना धमकीचे पत्र पाठवण्यात आले आहे. हे पत्र त्यांना त्यांच्या गाझियाबाद येथील कार्यालयात पाठवण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली असून पोलीस अन्वेषण करत आहेत. सत्यम पंडित ‘ब्राह्मण एकता दल’ संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. तसेच ते श्रीकृष्णजन्मभूमी न्यासाचे पदाधिकारीही आहेत. धमकीविषयी पंडित म्हणाले की, मी श्रीकृष्णजन्मभूमीचा खटला चालवत रहाणार आहे. मी धमकीमुळे घाबरणारा नाही. यापूर्वीही मला अशी धमकी मिळाली होती.
GZB एक बार फिर जान से मारने की धमकी मिली मैं बता देना चाहता हूं में डरने वाला नहीं श्री कृष्ण जन्मभूमि लेकर रहेंगे सत्यम पंडित वादी पक्षकार श्री कृष्ण जन्मभूमि मथुरा @dgpup @ChiefSecyUP @homeupgov @myogioffice @AmitShahOffice @ghaziabadpolice @Uppolice @RSSorg @mathurapolice pic.twitter.com/zbEo9RFXpS
— Satyam Pandit (@SatyamS05818543) December 2, 2023
संपादकीय भूमिकाबंदी घातलेली असतांनाही जिहादी संघटना कार्यरत कशी काय असू शकते ? अशांना मुळासकट नष्ट करणे आवश्यक ! |