पाकव्याप्त काश्मीरमध्ये बसवरील गोळीबारात ८ जणांचा मृत्यू, तर २६ जण घायाळ
नवी देहली – पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट बाल्टिस्तान येथे २ डिसेंबर या दिवशी सायंकाळी जिहादी आतंकवाद्यांनी एका बसवर अंदाधुंद गोळीबार केला. यात ८ जणांचा मृत्यू झाला, तर २६ जण घायाळ झाले. ही बस गिलगिटहून रावळपिंडीकडे जात होती. गोळीबारामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस विरुद्ध बाजूने येणार्या ट्रकला धडकली. मृतांमध्ये पाकिस्तान सैन्याच्या २ सैनिकांचाही समेवश आहे. आतापर्यंत या आक्रमणाचे दायित्व कुणीही स्वीकारलेले नाही.