स्वायत्त महाविद्यालयांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे कोट्यवधी रुपयांचे शुल्क थकवले !
विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचा कारवाईचा निर्णय !
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाशी संलग्न पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यांतील बहुतांश सर्व नामांकित महाविद्यालये स्वायत्त झाली आहेत. त्यामुळे स्वायत्त महाविद्यालयांना त्यांच्या स्तरावर परीक्षा घेण्याचे आणि निकाल घोषित करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. तरीही विद्यार्थ्यांची माहिती (डेटा) विद्यापिठाकडे ठेवावी लागते. त्यानुसार या महाविद्यालयांनी परीक्षा शुल्क म्हणून ठराविक रक्कम विद्यापिठाकडे वर्ग करणे बंधनकारक आहे; परंतु अनेक महाविद्यालयांनी कोट्यवधी रुपयांचे परीक्षा शुल्क थकवले आहे. विद्यापिठाने पाठपुरावा करूनही थकित शुल्क जमा न केल्यामुळे आता व्यवस्थापन परिषदेने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
स्वायत्त विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रावर विद्यापिठाचा लोगो आणि नाव असते. त्यामुळे नियमानुसार महाविद्यालयांनी विद्यापिठाला शुल्क देणे अपेक्षित आहे. तशी तरतूदही महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यामध्ये करण्यात आली आहे. मागील १० वर्षांपासून काही महाविद्यालयांनी विविध प्रकारचे शुल्क जमा केले नाही, तर काहींनी नियमानुसार जमा केले आहेत. थकित शुल्काची रक्कम वाढत असून ती कोट्यवधींच्या घरात पोचली आहे.
व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रवींद्र शिंगणापूरकर म्हणाले, ‘‘ज्या विद्यापिठाला निश्चित केलेले शुल्क देणे बंधनकारक आहे. अशा महाविद्यालयांनी थकित शुल्क जमा केले नाही, तर त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषद घेईल.’’
संपादकीय भूमिका
|