सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हाताच्या बोटांतून प्रक्षेपित होणार्या आकाशतत्त्वाची नादाच्या स्वरूपात अनुभूती घेणे आणि तशीच अनुभूती स्वतःच्या बोटांच्या संदर्भातही घेणे
‘९.१२.२०२२ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांच्या बोटांतून प्रक्षेपित होणार्या आकाशतत्त्वाची, म्हणजेच नादाची अनुभूती घेण्यासाठी काही प्रयोग आम्हा काही साधकांसमोर केले. ‘त्या प्रयोगांच्या वेळी मला काय जाणवले ?’, हे येथे दिले आहे.
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीत ‘शंख कानाला लावल्यावर जसा नाद येतो’, तसा नाद ऐकू येणे
१ अ. प्रयोग : प्रथम सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांच्या खोलीत येत असलेला सूक्ष्म नाद ऐकण्यास सांगितला.
१ आ. अनुभूती : डोळे मिटून एकाग्रतेने खोलीतील नाद ऐकल्यावर मला तो ‘शंख कानाला लावल्यावर जसा नाद येतो’, तसा जाणवला.
१ इ. अनुभूतीमागील शास्त्र : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे अध्यात्मातील ‘परात्पर गुरु’ या सर्वाेच्च पदावर आहेत. त्यामुळे ते ‘शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती’ या टप्प्यांपैकी ‘शांती’ या सर्वाेच्च अन् निर्गुण स्तराच्या टप्प्याला आहेत. त्यांचा प्रभाव ते रहात असलेल्या वास्तूवरही पडला असून ती वास्तूही त्यांच्यासारखीच निर्गुणाची, म्हणजेच विशालता, पोकळी, अनाहत नाद यांच्या अनुभूती देऊ शकते. सकारात्मक ऊर्जा (चैतन्य) असलेल्या खोलीतील पोकळीमध्ये सकारात्मक असा अनाहत नाद ऐकायला येतो. त्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चैतन्यमय खोलीत शंखामध्ये येतो, तसा सूक्ष्म सकारात्मक नाद (अनाहत नाद) ऐकायला आला.
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी माझ्या कानासमोर त्यांचा हात धरल्यावर खोलीतील नाद आणखी स्पष्ट ऐकायला येणे आणि तो नाद ऐकून पुष्कळ शांत वाटणे, तसेच ध्यान लागल्यासारखे होणे
२ अ. प्रयोग : त्यानंतर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी आम्हाला आमचा उजवा कान त्यांच्याकडे करून आणि डोळे मिटून बसायला सांगितले. त्यांनी दुरूनच (दीड ते दोन मीटर अंतरावरून) त्यांचा उजवा हात बोटे सरळ ठेवून आमच्या प्रत्येकाच्या कानासमोर येईल असा साधारण १५ ते ३० सेकंद धरला. त्यांच्या बोटांतून जे आकाशतत्त्व, म्हणजे जो नाद प्रक्षेपित होतो, तो त्यांनी एकाग्रतेने ऐकायला सांगितला आणि आम्हाला ‘नादाची किंवा आणखी काय अनुभूती येते’, हे सांगायला सांगितले.
२ आ. अनुभूती : मला खोलीतील नाद आणखी स्पष्ट ऐकायला आला. त्या वेळी मला पुष्कळ शांत वाटले आणि माझे ध्यान लागल्यासारखे झाले, तसेच ‘त्याच स्थितीत रहावे’, असेही मला वाटले.
२ इ. अनुभूतीमागील शास्त्र : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे अध्यात्मातील शांतीच्या, म्हणजे पंचमहाभूतांपैकी आकाशतत्त्वाच्या स्तरावर असल्याने त्यांनी प्रयोगामध्ये हात माझ्या कानासमोर केल्यावर त्यांच्या बोटांतून आकाशतत्त्व पुष्कळ प्रमाणात प्रक्षेपित झाले. त्यामुळे खोलीतील अनाहतनादामध्ये वृद्धी होऊन तो मला स्पष्ट ऐकू आला. आकाशतत्त्वातील शांतीच्या स्पंदनांमुळे माझे ध्यान लागले. तसेच प्रत्येकाला शांतीची अनुभूती हवीहवीशी वाटते. त्यामुळे मला ‘त्याच स्थितीत रहावे’, असेही वाटले.
३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांचा हात एका साधकाच्या कानापासून दूर दूर नेल्यावर त्यांच्या बोटांतून निघणारा सूक्ष्म नाद त्याला मोठा मोठा ऐकायला येणे आणि ही अनुभूती त्याच वेळी अन्य साधकांनाही येणे
३ अ. प्रयोग : या प्रयोगात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘हात दुसर्याच्या कानापासून दूर नेला असता बोटांतून प्रक्षेपित होणार्या आकाशतत्त्वामध्ये काय पालट अनुभवायला येतो ?’, हे पाहिले. यासाठी त्यांनी प्रथम आपला हात एका साधकाच्या कानासमोर त्याच्यापासून ३० सें.मी. अंतरावर धरला आणि त्याला नाद अनुभवायला सांगितला. यानंतर त्यांनी आपला हात त्याच्या कानापासून हळू हळू दूर नेला आणि ‘काय अनुभवायला आले ?’, हे विचारले.
३ आ. अनुभूती : या प्रयोगाच्या वेळी मलाही त्या नादाची अनुभूती घेता आली. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांचा हात साधकाच्या कानापासून दूर नेल्यावर मला त्यांच्या बोटांतून निघणारा सूक्ष्मातील नाद अधिकाधिक मोठा ऐकायला आला. ज्या साधकाच्या कानासमोर हा प्रयोग करण्यात आला, त्यालाही तसेच जाणवले. माझ्याव्यतिरिक्त अन्य साधकांनाही तशीच अनुभूती आली.
३ इ. अनुभूतीमागील शास्त्र : प्रयोगात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकाच्या कानाजवळ असलेला त्यांचा हात त्या साधकापासून दूर दूर नेल्यावर सूक्ष्मातील नाद ऐकू येण्याचे प्रमाण वाढत गेले. याचे कारण म्हणजे कानापासूनचे अंतर वाढत गेल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या बोटांतून प्रक्षेपित होणार्या आकाशतत्त्वाला अधिकाधिक गती प्राप्त झाली, तसेच ते अधिकाधिक पसरत गेले, म्हणजे व्यापक झाले. त्यामुळे प्रयोगातील साधकांना सूक्ष्मातील नाद वाढत गेल्याचे जाणवले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी हा प्रयोग एकाच साधकावर केला असूनही तेथे उपस्थित असलेल्या अन्य साधकांनाही तीच अनुभूती आली. याचे कारण म्हणजे तो प्रयोग बघतांना अन्य साधक ज्याच्यावर प्रयोग केला, त्या साधकाशी एकरूप झाले होते.
४. स्वतःची बोटे स्वतःच्या कानासमोर नेऊन प्रयोग करणे
४ अ. प्रयोग पहिला
४ अ १. प्रयोग : यामध्ये आम्हाला ‘आमच्या हाताची बोटे आमच्या कानाजवळ नेऊन आकाशतत्त्वाची काय अनुभूती येते ?’, हे पहायचे होते. यातील पहिल्या प्रयोगात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी प्रथम आम्हाला आमच्या उजव्या हाताच्या करंगळीचा नाद ऐकायला सांगितला. त्यानंतर करंगळीसोबत पुढचे पुढचे बोट वाढवून त्या दोन बोटांचा एकत्रित नाद, मग तीन बोटांचा एकत्रित नाद, असे करत शेवटी पाचही बोटांचा एकत्रित नाद ऐकायला सांगितला. तेव्हा मला पुढील अनुभूती आल्या.
४ अ २. अनुभूती
४ अ ३. अनुभूतींमागील शास्त्र : मनुष्याचा देह हा पंचतत्त्वांनी बनलेला असतो. साधना केल्याने मनुष्यातील पंचतत्त्वे चैतन्याच्या स्तरावर देहातून प्रक्षेपित होऊ लागतात. त्याप्रमाणेच ती हाताच्या प्रत्येक बोटातूनही प्रक्षेपित होतात. असे जरी असले, तरी हाताच्या प्रत्येक बोटातून पंचतत्त्वांपैकी विशिष्ट तत्त्व अधिक प्रमाणात प्रक्षेपित होत असते, उदा. करंगळीतून पृथ्वीतत्त्व, अनामिकेतून आपतत्त्व, मध्यमेतून तेजतत्त्व, तर्जनीतून वायुतत्त्व आणि अंगठ्यातून आकाशतत्त्व. आता विविध बोटांमुळे आलेल्या नादाच्या विविध अनुभूतींमागील शास्त्र आपण पाहू.
अ. प्रयोगामध्ये करंगळी कानाजवळ नेल्यावर तिच्यातून नाद ऐकू आला; कारण जरी ती पृथ्वीतत्त्वाशी संबंधित असली, तरी तिच्यातूनही थोड्या प्रमाणात आकाशतत्त्वही प्रक्षेपित होतच असते. त्यामुळे तिच्यातून नाद ऐकू आला. तसेच तिच्यामुळे जडत्व जाणवण्याचे कारण म्हणजे तिच्यातून पृथ्वीतत्त्व, म्हणजे शक्ती अधिक प्रमाणात प्रक्षेपित होते.
आ. करंगळीसोबत अनामिकाही कानाजवळ नेल्यावर नाद ऐकू येण्याचे प्रमाण वाढले; कारण करंगळीपेक्षा अनामिकेतून आकाशतत्त्व प्रक्षेपित होण्याचे प्रमाण थोडे अधिक आहे. करंगळी ते अंगठा या क्रमाने गेल्यास बोटातून प्रक्षेपित होणार्या आकाशतत्त्वाचे प्रमाण वाढत जाऊन अंगठ्यामधून ते सर्वाधिक प्रमाणात प्रक्षेपित होते.
इ. करंगळी आणि अनामिका यांच्यासोबत मधले बोटही कानाजवळ धरल्यावर नादातील सूक्ष्मता वाढली; कारण त्या तिन्ही बोटांमुळे आकाशतत्त्व प्रक्षेपित होण्याचे प्रमाण वाढल्याने स्पंदने अधिक सूक्ष्म झाली. याचे कारण म्हणजे आकाशतत्त्व हे सर्वाधिक सूक्ष्म आहे.
ई. करंगळी, अनामिका आणि मध्यमा यांच्यासोबत तर्जनीही कानाजवळ धरल्यावर तिच्यातील वायुतत्त्वामुळे हलकेपणा जाणवला. तसेच आकाशतत्त्वाचे प्रमाण आणखी वाढल्याने शांतही वाटू लागले.
उ. करंगळी, अनामिका, मध्यमा, तर्जनी आणि अंगठा ही पाचही बोटे कानाजवळ नेल्यावर आकाशतत्त्वाच्या सर्वाधिक प्रमाणामुळे त्या तत्त्वाच्या ‘पोकळी जाणवणे, ध्यान लागणे आणि देहाचा विसर पडणे’, या अनुभूती आल्या.
४ आ. प्रयोग दुसरा
४ आ १. प्रयोग : या प्रयोगामध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी आम्हाला ‘प्रत्येक बोटातून प्रक्षेपित होणार्या आकाशतत्त्वाची काय वेगवेगळी अनुभूती येते ?’, हे अभ्यासायला सांगितले. यासाठी आम्ही उजव्या हाताच्या करंगळीपासून प्रयोगाला आरंभ करून अंगठ्यापर्यंत एका एका बोटाचा नाद ऐकला.
४ आ २. अनुभूती : यासंदर्भात मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
४ आ ३. अनुभूतींमागील शास्त्र
अ. येथे प्रत्येक बोटातून अधिक प्रमाणात प्रक्षेपित होणार्या विशिष्ट पंचतत्त्वाप्रमाणे अनुभूती आल्या, उदा. करंगळीतील पृथ्वीतत्त्वामुळे जडत्व जाणवणे, अनामिकेतील आपतत्वामुळे कमी जडत्व जाणवणे, मध्यमेतील तेजतत्त्वामुळे उष्णता जाणवणे, तर्जनीतील वायुतत्त्वामुळे हलकेपणा जाणवणे आणि अंगठ्यातील आकाशतत्त्वामुळे शांत वाटणे.
आ. करंगळीतून आकाशतत्त्व अगदी अल्प प्रमाणात प्रक्षेपित होते. करंगळीच्या पुढील बोटांतून आकाशतत्त्व प्रक्षेपित होण्याचे प्रमाण वाढत जाऊन शेवटच्या अंगठ्यातून ते सर्वाधिक प्रमाणात प्रक्षेपित होते. त्यामुळे करंगळी ते अंगठा या क्रमाने गेल्यावर सूक्ष्मातील नाद ऐकू येण्याचे प्रमाण वाढत गेले. अंगठ्यामुळे सर्वांत जास्त प्रमाणात आकाशतत्त्वाची अनुभूती आली, उदा. शांत वाटणे, देहाचे अस्तित्व न जाणवणे आणि ‘आपण निर्गुण पोकळीत आहोत’, असे जाणवणे.
४ आ ३ अ. अंगठ्यातून आकाशतत्त्व प्रक्षेपित होत असूनही अंगठ्यामुळे कोणताही नाद ऐकू न येता ‘शांत वाटणे, देहाचे अस्तित्व न जाणवणे’, अशा अनुभूती येण्याचे कारण : अंगठ्यातून आकाशतत्त्व प्रक्षेपित होत असल्याने आणि पंचतत्त्वांपैकी आकाशतत्त्व हे सर्वाधिक निर्गुण स्तरावरील असल्याने अंगठा कानाजवळ नेल्यावर कोणताही नाद ऐकू न येता ‘शांत वाटणे, देहाचे अस्तित्व न जाणवणे, पोकळी जाणवणे’, अशा निर्गुण स्तरावरील अनुभूती आल्या. आकाशतत्त्वातूनच, म्हणजे निर्गुणातून सर्व गोष्टींची उत्पत्ती होत असते.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेनेच आम्हा साधकांना बोटांतून प्रक्षेपित होणार्या आकाशतत्त्वाच्या अनुभूती घेता आल्या. त्यांनी प्रयोग करून आम्हाला शिकवले. यासाठी आम्ही त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१३.१२.२०२२)