रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय
१. सौ. वीणा अ. दाते, सोलापूर
अ. ‘आश्रमात आल्यावर मला वेगळ्याच विश्वात असल्यासारखे वाटले.
आ. आश्रमात असतांना माझ्या मनात इतर विचार आले नाहीत. दोन घंट्यांत मला एवढे जाणवले, तर सातत्याने येथे सेवा करणारे खरे पुण्यवानच म्हणायचे !’
२. सौ. संगीता कुलगोड, वास्को, गोवा.
अ. ‘आश्रम पाहून मला प्रसन्न वाटले.
आ. सनातन संस्थेचे एवढे मोठे कार्य बघून मला अभिमान वाटला.
इ. ‘आपल्या हिंदु धर्माविषयी आस्था आणि आत्मीयता वाढायला पाहिजे’, असे मला वाटले. धर्मकार्य करणार्या सर्व साधकांना शतशः नमन !’
३. डॉ. निधी चक, पुणे
अ. ‘आश्रम पाहिल्यावर मला पुष्कळ आनंद मिळाला.
आ. काही विषयांच्या संदर्भात माझ्या मनात साशंकता होती. मी आश्रमात त्या विषयांवरील संशोधनाच्या संदर्भात ऐकले आणि मला ‘त्यांविषयी अधिक माहिती मिळेल’, याची निश्चिती झाली.’
४. डॉ. यशवंतराव पाटील, बुलढाणा
अ. ‘आश्रम बघितल्यावर मला प्रसन्नतेची अनुभूती आली. ती शब्दांत वर्णन करणे अशक्य आहे.
आ. भारतीय परंपरा आणि अध्यात्म यांचे वैज्ञानिक तंत्रज्ञान वापरून जे संशोधन केले जात आहे, ते अत्यंत स्तुत्य आहे.’
सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून दिलेले अभिप्राय
१. सौ. संगीता कुलगोड, वास्को, गोवा.
अ. ‘आसमंतात अनिष्ट शक्ती असतात’, असे मी ऐकून होते; पण त्या विषयावर एवढ्या सूक्ष्म स्तरावर केला जाणारा अभ्यास मी पहिल्यांदाच पाहिला.’
२. डॉ. निधी चक, पुणे
अ. ‘प्रदर्शन पाहिल्यावर माझ्या मनात सूक्ष्म जगताविषयी अधिक उत्सुकता निर्माण झाली.’
३. डॉ. यशवंतराव पाटील, बुलढाणा
अ. ‘आश्रमात सूक्ष्म आणि अभौतिक (Immaterial) गोष्टींचे वैज्ञानिक स्तरावर संशोधन चालते. आपल्या सनातन धर्मातील ज्ञानाची जगासमोर वैज्ञानिक दृष्टीकोनातून केलेली ही मांडणी पाहून मी पुष्कळ भारावून गेलो.’
(सर्व सूत्रांचा दिनांक जुलै २०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |