भीषण आपत्काळ आरंभ होण्यापूर्वीच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ग्रंथनिर्मितीच्या कार्यात सहभागी होऊन शीघ्र ईश्वरी कृपेस पात्र व्हा !
आपत्काळापूर्वी परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित ग्रंथ लवकर प्रकाशित होणे आवश्यक !
१. रामराज्यातील प्रजा सात्त्विक होती; म्हणून तिला श्रीरामासारखा आदर्श राजा मिळाला. रामराज्यासम सर्वांगसुंदर आणि आदर्श असे हिंदु राष्ट्र अनुभवता येण्यासाठी आजचा समाजही सात्त्विक होणे अपरिहार्य आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले संकलित करत असलेल्या ग्रंथांतील ज्ञानाने समाज सात्त्विक (साधक) होऊन तो हिंदु राष्ट्रासाठी पोषक होणार आहे. यातूनच हिंदु राष्ट्राची जडणघडण होणार आहे.
२. तिसरे महायुद्ध, महापूर इत्यादींच्या रूपातील महाभयंकर आपत्काळातून वाचलो, तरच आपण हिंदु राष्ट्र पाहू शकू ! आपण साधना केली, तरच आपत्काळातून वाचू शकतो; कारण साधकांवर देवाची कृपा असते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले संकलित करत असलेल्या ग्रंथांतून सुयोग्य, सध्याच्या वैज्ञानिक युगातील पिढीला सहज पटेल असे वैज्ञानिक परिभाषेत आणि काळानुसार आवश्यक अशा साधनेचे ज्ञान मिळते. त्यामुळे या ग्रंथांचे महत्त्व असाधारण आहे.
३. प्रत्येकाची प्रकृती आणि आवड यांनुसार त्याला अध्यात्माचे शिक्षण मिळाले, तर त्याच्यात साधनेची आवड लवकर निर्माण होते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले विविधांगी विषयांवरील ग्रंथ संकलित करत असल्याने त्या माध्यमातून अनेक जण आपापली प्रकृती आणि आवड यांनुसार साधनेकडे लवकर वळू शकतात.
४. हिंदु राष्ट्र हे काही सहस्रो वर्षे टिकेल; परंतु ग्रंथांतील ज्ञान अनंत काळ टिकणारे असल्याने जसे हिंदु राष्ट्र लवकर येणे आवश्यक आहे, तितकीच घाई भीषण आपत्काळ चालू होण्यापूर्वी हे ग्रंथ प्रकाशित करण्याचीही आहे.
यासाठीच ‘या ग्रंथकार्यात सहभागी होणे’, ही ईश्वरी कृपेची मोठी पर्वणीच आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी संकलित केलेले; पण अद्याप अप्रकाशित असे सुमारे ५००० ग्रंथ आहेत. या ग्रंथांच्या माध्यमातून यांतील ज्ञान शक्य तितक्या लवकर समाजापर्यंत पोचणे आवश्यक आहे. या ग्रंथकार्यात सहभागी होऊन सर्वांनीच या संधीचा अधिकाधिक लाभ करून घ्यावा !
ग्रंथसेवेच्या अंतर्गत संकलन, भाषांतर, संरचना, मुखपृष्ठ-निर्मिती, मुद्रण इत्यादी विविध सेवांमध्ये सहभागी होऊ इच्छिणार्यांनी स्वत:ची माहिती सनातनच्या जिल्हासेवकांच्या माध्यमातून पाठवावी.
संपर्क : सौ. भाग्यश्री सावंत,
ई-मेल : sankalak.goa@gmail.com
टपालासाठी पत्ता : द्वारा ‘सनातन आश्रम’, रामनाथी, फोंडा, गोवा ४०३ ४०१.’
– (पू.) संदीप आळशी, सनातनच्या ग्रंथांचे संकलक (२१.६.२०२१)