‘मंदिर परिषदे’च्या वेळी सेवा करतांना सौ. क्षिप्रा प्रशांत जुवेकर यांना आलेली अनुभूती !

सौ. क्षिप्रा जुवेकर

‘श्री गुरूंची ऊर्जा अत्यधिक प्रमाणात स्वतःच्या देहातून निघत आहे’, असे जाणवणे आणि ‘ही शक्तीची अनुभूती आहे’, असे एका संतांनी सांगणे : ‘४ आणि ५.२.२०२३ या दिवशी हिंदु जनजागृती समिती अन् श्री गणपति मंदिर देवस्थान विश्वस्त मंडळ (पद्मालय, जळगाव) यांच्या वतीने जळगावमध्ये प्रथमच ‘मंदिर परिषदे’चे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी सेवा करतांना मला पुष्कळ आनंद मिळाला. परिषदेच्या आदल्या दिवशी, म्हणजे ३.२.२०२३ या दिवशी कार्यक्रमस्थळी समितीचे कार्यकर्ते सेवा करत होते. सेवा करत असतांना ‘माझ्या आत आनंदाचे तरंग उमटत आहेत’, असे मला जाणवत होते. ‘श्री गुरूंनी मला या सेवेची संधी दिली आणि तेच माझ्याकडून ती सेवा करून घेत आहेत’, याबद्दल माझ्याकडून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त झाली. अकस्मात् एका ताईने काही विचारण्यासाठी मला हात लावला असता तिच्या हाताला झटका बसला. त्यानंतर दुसर्‍या एका साधिकेने मला हात लावला, तर तिच्याही हाताला झटका बसला. नंतर मी कॉफीच्या कागदी पेल्याला हात लावल्यावर मलाही झटका बसला. त्या वेळी मला वाटले, ‘श्री गुरूंची ऊर्जा अत्यधिक प्रमाणात माझ्या देहातून निघत आहे.’ याविषयी एका संतांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘ही शक्तीची अनुभूती आहे.’’ श्री गुरूंच्या कृपेमुळेच मला ही अनुभूती आली. ती मी त्यांच्या चरणी अर्पण करते.’

– सौ. क्षिप्रा प्रशांत जुवेकर (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ३९ वर्षे), जळगाव (४.८.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक