Corrupt ED : तमिळनाडूमध्ये अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकार्याला २० लाख रुपयांची लाच घेतांना अटक
मदुराई (तमिळनाडू) – तमिळनाडूच्या लाचलुचपत प्रतिबंधक आणि दक्षता पथकाने अंमलबजावणी संचालनालयाचा अधिकारी अंकित तिवारी याला दिंडीगुल येथील एका सरकारी डॉक्टरकडून ५१ लाख रुपयांच्या लाचेपैकी २० लाख रुपयांचा पहिला हप्ता घेतांना रंगेहाथ अटक केली. या डॉक्टरला जुन्या प्रकरणात पंतप्रधान कार्यालयातून कारवाई करण्याचे आदेश आल्याचे धमकावून ५१ लाख रुपयांची लाच मागितली होती. अंकित तिवारी मदुराई येथील ईडीच्या कार्यालयात तैनात आहे.
अंकित याने या डॉक्टरला धमकावून कार्यालयात बोलावले होते. त्याच्याकडे कारवाई करण्यासाठी ३ कोटी रुपयांची मागणी केली होती. शेवटी ५१ लाख रुपये देण्याचे अंतिम झाले होते. यानंतर डॉक्टरला अंकितविषयी संशय आल्याने त्याने दिंडीगुल येथे लाचलुचपत प्रतिबंधक आणि दक्षता पथक यांच्या कार्यालयात जाऊन तक्रार केली.
संपादकीय भूमिकाज्या अधिकार्यांनी घोटाळ्यांवर कारवाई करायची असते, तेच भ्रष्टाचार करत असतील, तर अशांना फाशीचीच शिक्षा देण्याची तरतूद कायद्यात करणे आता अपरिहार्य झाले आहे ! |