OBC Maratha Reservation Controversy : ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांच्यावर प्रक्षोभक वक्तव्य केल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद !
हिंगोली : इतर मागासवर्गीय समाजाच्या विरोधात बोलणार्यांचे हातपाय तोडण्याची ताकद ठेवा, असे वक्तव्य केल्याच्या कारणावरून इतर मागासवर्गीय समाजाचे (ओबीसीचे) नेते बबनराव तायवाडे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मराठा समाजाच्या वतीने तक्रार देण्यात आली होती. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचा ओबीसी समाजात समावेश करण्यास ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. या विरोधात २६ नोव्हेंबर या दिवशी येथे घेण्यात आलेल्या मेळाव्यामध्ये त्यांनी वरील वक्तव्य केले.
(सौजन्य : TV9 Marathi)
संपादकीय भूमिकाआज धर्मांध जिहादी लोक हिंदूंच्या जिवावर उठले आहेत. कधी नव्हे एवढी हिंदूंच्या संघटनाची आवश्यकता आहे. असे असतांना हिंदूंनी त्यांचा शत्रू ओळखून त्याच्या विरोधात संघटित होण्याचे सोडून एकमेकांच्या विरोधात लढत राहिल्यास ‘इतिहासातून आपण काहीच शिकलो नाही’, असे होईल ! |