रायपूर (छत्तीसगड) येथील सौ. हिना परमार यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जायचे आहे, हे कळल्यावर आलेल्या अनुभूती !
१. रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जाण्याची संधी मिळाल्याचे कळल्यावर कृतज्ञता वाटणे
‘२.८.२०२३ ते ५.८.२०२३ या कालावधीत मला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जायचे आहे’, हे समजल्यावर माझे कृतज्ञताभाव आणि शरणागतभाव पुष्कळ जागृत झाले. ‘गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) अपेक्षित असे प्रयत्न माझ्याकडून होत नाहीत; तरीही गुरुदेवांच्या कृपेने मला ही संधी मिळत आहे’, यासाठी मला कृतज्ञता वाटत होती.
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या दर्शनाचा लाभ होणार आहे, असा विचार करून भावजागृतीचे प्रयत्न करणे
‘आता पूर्ण पुरुषोत्तम मास (अधिक मास) चालू आहे. साक्षात् पूर्ण पुरुषोत्तमस्वरूप गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) दर्शनाचा लाभ होणार आहे’, असा भाव माझ्यात निर्माण झाला. माझ्याकडून त्या भावातच रहाण्याचे प्रयत्न झाले; परंतु नंतर घरात काही प्रतिकूल प्रसंग घडल्यामुळे माझ्याकडून भावजागृतीचे प्रयत्न अल्प होऊ लागले. नंतर माझ्या मनात विचार आले, ‘हे तर अशाश्वत आहे, अज्ञान आहे, माया आहे, तर मी असे विचार का करू ? मला केवळ भावजागृतीचे प्रयत्न करायचे आहेत. जे शाश्वत आहे, ज्यामध्ये ज्ञान आहे, त्या विचारांमध्ये मला रहायचे आहे. मी भावजागृतीचे विचार केले, तरच भाव जागृत होईल.’ त्यानंतर माझ्याकडून तसे प्रयत्न होऊ लागले.
३. एकटीने प्रवास करतांना ‘गुरुदेव समवेत आहेत’, असा भाव ठेवणे
रायपूरवरून मला एकटीलाच रामनाथी आश्रमात जायचे होते, तरीही मला मुळीच भीती वाटली नाही. ‘गुरुदेवच माझ्या समवेत आहेत आणि तेच मला घेऊन जाणार आहेत’, असे मला वाटत होते.’
हे सर्व केवळ गुरुदेवांच्या कृपेमुळे झाले. त्यांनीच माझ्याकडून हे करून घेतले, त्यासाठी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त झाली.’
– सौ. हिना परमार, रायपूर, छत्तीसगड. (६.८.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |