पंतप्रधान मोदी यांची मुत्सद्देगिरीची क्लृप्ती आणि विरोधकांना शह !
‘फताह’ हे ‘हरकत अल-ताहरीर अल-फिलिस्टिनिया’ या त्यांच्या नावाच्या ‘शॉर्ट फॉर्म’ला उलट केल्यावर आलेले नाव आहे. ‘फताह’ची स्थापना अनेक लोकांनी केली होती. विशेषत: पॅलेस्टिनी ॲथॉरिटीचे दिवंगत अध्यक्ष यासर अराफत, खलील अल-वझीर, सलाह खलफ आणि महमूद अब्बास जे पॅलेस्टिनी ॲथॉरिटीचे सध्याचे अध्यक्ष आहेत. वर्ष २००५ मध्ये स्थानिक निवडणुकांमध्ये भाग घेतलेल्या हमासने पॅलेस्टिनी राजकारणात राजकीय पक्ष म्हणून प्रवेश केला आणि वर्ष २००६ मध्ये संसदीय निवडणुकीत सत्ता मिळवली. त्यानंतर हमासने कधीही निवडणुकाच घेतल्या नाहीत ! त्यामुळे जगभरातील अनेक देश आणि पॅलेस्टिनी ॲथॉरिटी सध्याच्या हमासच्या सरकारला पॅलेस्टाईनच्या जनतेचे ‘वैध’ सरकारच मानत नाहीत. पॅलेस्टिनी ॲथॉरिटीचा इस्रायल-पॅलेस्टाईन वादावर राजनैतिक उपायांवर, तर हमासचा आतंकवाद आणि इस्त्रायलचे अस्तित्वच नष्ट करणे यांवर विश्वास आहे.
पंतप्रधान मोदी यांनी केलेले ट्वीट, त्याचा अर्थ आणि तत्त्वनिष्ठ भूमिका !
या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी केलेले ‘ट्वीट’ बघा : ‘पॅलेस्टिनी ॲथॉरिटीचे अध्यक्ष महमूद अब्बास यांच्याशी बोललो. गाझामधील हॉस्पिटलमध्ये नागरिकांच्या जीवितहानीविषयी शोक व्यक्त केला. आम्ही ‘पॅलेस्टिनी लोकांसाठी’ मानवतावादी साहाय्य पाठवत राहू. या प्रदेशातील ‘आतंकवाद’, हिंसाचार आणि ढासळत चाललेली सुरक्षा परिस्थिती यांवर भारताने तीव्र चिंता व्यक्त केली. या भारताच्या दीर्घकालीन ‘तत्त्वनिष्ठ’ भूमिकेचा पुनरुच्चार केला !’
१. मोदी कुणाशी बोलले ? : ‘पॅलेस्टिनी ॲथॉरिटी’ या राजकीय पक्षाशी.
२. मानवतावाद कुणाला दाखवू म्हणाले ? : पॅलेस्टिनी लोकांसाठी, तिकडच्या बेकायदेशीर आणि आतंकवादी सरकार यांना नाही.
३. चिंता कशाची व्यक्त केली ? : आतंकवाद आणि हिंसाचार यांची (हमास करत असलेल्या)
४. इस्रायलला मोदी काही बोलले का ? : एक शब्दही नाही.
५. पंतप्रधान मोदींनी भारताची दीर्घकालीन तत्त्वनिष्ठ भूमिका बदलली का ? : अजिबात नाही ! भारत आतंकवादाच्या विरोधात होता आणि आहे. भारत पॅलेस्टाईनच्या लोकांसमवेत होता आणि आजही आहे.
ज्या लोकांना वाटत आहे की मोदींनी ‘सेव्ह गाझा’ म्हटले, त्यांना फक्त मोदींचे एक ट्वीट समजायला जर दिवस जातो, तर मोदी काय समजणार ? पाकिस्तान, तुर्कीसारखे १-२ देश वगळता इतर सर्व इस्लामिक देश अन् इस्रायल (ऑल वेदर फ्रेंड) भारताच्या भूमिकेवर खूश असणार आहेत. हमासला पाठिंबा दिला नाही; म्हणून विरोधकांना पुन्हा एकदा सुतक लागले असणार आहे.
– वेद कुमार
(साभार : फेसबुक)