शेतीसाठी पाणीउपसा करणार्या पाच लघु पाटबंधारे तलावांवर उपसाबंदी !
कोल्हापूर – पंचगंगा पाटबंधारे उपविभागांतर्गत करवीर तालुक्यातील कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगाव आणि दर्याचे वडगाव लघु पाटबंधारे तलाव येथील जलाशयातील पाण्यावर शेतीसाठी पाणीउपसा करण्यास बंदी घालण्यात आली आहे, असे पंचगंगा पाटबंधारे उपविभागाचे साहाय्यक अभियंता संदीप दावणे यांनी कळवले आहे. ही उपसाबंदी ३ डिसेंबरपर्यंत, तसेच ८ ते १७ डिसेंबर आणि २२ डिसेंबरपासून पुढील आदेशापर्यंत कार्यरत रहाणार आहे.
उपसाबंदी अमलात आणावयाच्या कार्यक्षेत्रातील महाराष्ट्र राज्य विद्युत् मंडळातील अधिकारी आणि क्षेत्रीय कर्मचारी यांनी नमूद केलेल्या जलाशयांतील सर्व तीरांवर नमूद केलेल्या कालावधीत शेतीसाठी पाणी उपसा करणार्या विद्युत् उपसायंत्राची तारामंडळे काढून घ्यावीत. उपसाबंदी कालावधीत अनधिकृत उपसा आढळून आल्यास संबंधित उपसायंत्र धारकाचा उपसा अनुज्ञप्ती (परवाना) १ वर्षाच्या कालावधीसाठी रहित करण्यात येईल, असेही कळवण्यात आले आहे.