खोटे किंवा सूड उगवण्यासाठी बलात्कारांच्या तक्रारींमध्ये वाढ होत असल्याने पीडितेचा जबाब, हा मोठा पुरावा होऊ शकत नाही ! – कोलकाता उच्च न्यायालय
कोलकाता (बंगाल) – बलात्काराच्या प्रकरणात पीडित महिलेचा जबाब, हा मोठा पुरावा होऊ शकत नाही; कारण अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, जेथे पीडितेने खोटे किंवा सूड उगवण्याच्या उद्देशाने बलात्कार झाल्याची तक्रार प्रविष्ट केली, असे कोलकाता उच्च न्यायालयाने एका प्रकरणाची सुनावणी करतांना सांगितले. या प्रकरणी बलात्काराच्या प्रकरणात शिक्षा भोगणार्या आरोपीला शिक्षेला आव्हान देण्याची अनुमती न्यायालयाने दिली.