मणीपूरमध्ये पंजाब नॅशनल बँकेत १८ कोटी ८० लाख रुपयांचा दरोडा !
इंफाळ (मणीपूर) – मणीपूर राज्यातील उखरूल जिल्ह्यात दरोडेखोरांनी पंजाब नॅशनल बँकेतून १८ कोटी ८० लाख रुपयांची रोकड लुटली. सर्व दरोडेखोरांनी चेहरा झाकला होता. त्यांनी प्रथम बँकेतील कर्मचार्यांना प्रसाधनगृहात कोंडले आणि कॅशियरला धाक दाखवून तिजोरीचे टोळे उघडायला लावले अन् त्यातील पैसे घेऊन पलायन केले. ही घटना ३० नोव्हेंबरला दुपारी घडली. पोलीस या घटनेचे अन्वेषण करत आहेत.
पोलीस अधिकार्यांनी सांगितले की, काही दरोडेखोर अत्याधुनिक शस्त्रांसह बँकेत घुसले. त्यांनी बँकेच्या रक्षकांवर आक्रमण केले आणि कर्मचार्यांना बंदुकीचा धाक दाखवला.
सौजन्य सीनएन न्यूज 18
संपादकीय भूमिकामणीपूरमध्ये आधीच गेल्या काही मासांपासून हिंसाचार चालू असतांना आणि सर्वत्र सुरक्षादल तैनात असतांना अशी घटना घडणे लज्जास्पद ! |