Land Mafia Arrested – गोवा : मुख्य आरोपी महंमद सुहेल आणि अन्य २ जण पुन्हा अन्वेषण पथकाच्या कह्यात
भूमी बळकावल्याचे प्रकरण
पणजी, ३० नोव्हेंबर (वार्ता.) : कोट्यवधी रुपयांच्या भूमी घोटाळ्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी महंमद सुहेल उपाख्य मायकल फर्नांडिस याच्यासह रॉयसन रॉड्रिग्स आणि स्टीव्हन डिसोझा या अन्य २ संशयितांना प्रकरणाचे अन्वेषण करणार्या विशेष अन्वेषण पथकाने ३० नोव्हेंबर या दिवशी पुन्हा कह्यात घेतले.
विशेष अन्वेषण पथकाने यापूर्वी या संशयितांना अनेक वेळा कह्यात घेतले आहे आणि त्यांची पुढे जामिनावर सुटका झाली आहे. (कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करणार्यांना जामीन कसा मिळतो ? – संपादक) संशयितांनी भूमीच्या मूळ कागदपत्रांमध्ये फेरफार करून बनावट कागदपत्रे सिद्ध करून भूमी स्वत:च्या नावावर करून घेतली. याद्वारे राज्यात अनेक ठिकाणी कोट्यवधी रुपयांची भूमी बळकावण्यात आली. अंमलबजावणी संचालनालयाने या प्रकरणी कारवाई करतांना संशयितांची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता कह्यात घेतलेली आहे.