अंनिसच्या वतीने महापालिकेच्या शाळांमध्ये राबवण्यात येणारे उपक्रम थांबवण्याची तक्रार करून मागणी !
अशी मागणी करण्याची वेळी हिंदुत्वनिष्ठांवर का येते ?
आयुक्तांकडे देण्यात आलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, नवरात्रीत हिंदु धर्म, संस्कृती यांविरोधात एक कार्यक्रम महापालिकेच्या तुर्भे गाव शाळा क्र. १०७ मध्ये आयोजित करण्यात आला होता. या संदर्भात स्थानिक वर्तमानपत्रांत बातमी प्रसिद्ध झाली आहे. हा कार्यक्रम धार्मिक भावना भडकावून समाजामध्ये अशांतता निर्माण करण्याचा कट आहे. समाजामध्ये अशा कार्यक्रमांमुळे धार्मिक तेढ निर्माण होऊन अराजकता माजू शकते. त्याला महापालिका आणि आयोजक, मुख्याध्यापक, वक्ता हे कारणीभूत ठरतील. अंनिस केवळ हिंदु धर्माला लक्ष्य करत कोट्यवधी भक्तांचा अपमान करत आहे. तसेच संविधानाने दिलेल्या धार्मिक पालन स्वातंत्र्य, अभिव्यक्तीस्वातंत्र्य यांवर घाला घालत आहे. त्यामुळे समस्त हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत. या प्रकरणी मुख्याध्यापक आणि सर्व संबंधित कर्मचारी, वक्ता, आयोजक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच सध्या अंनिसच्या वतीने महापालिकेच्या शाळांमध्ये काही उपक्रम राबवले जात आहेत, ते त्वरित बंद करण्यात यावेत आणि यापुढे कोणतेही उपक्रम राबवण्यास अंनिसला अनुमती देण्यात येऊ नये, अशी मागणी शिष्टमंडळाने केली होती, अशी माहिती विश्व हिंदु परिषदेचे बेलापूर प्रखंड मंत्री स्वरूप पाटील यांनी दिली. त्यावर चौकशी समिती नेमून अहवाल मागवण्यात आला होता. यामध्ये वरील गोष्ट उघड झाली आहे.