दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : ‘पार्ट टाइम’ नोकरीचे आमीष दाखवून फसवणूक !; रुग्णवाहिका चालकाची हत्या करणार्या ४ धर्मांधांना अटक !
‘पार्ट टाइम’ नोकरीचे आमीष दाखवून फसवणूक !
नाशिक – ‘ऑनलाईन पार्ट टाइम’ (अर्धवेळ काम) नोकरीचे आमीष दाखवून वेगवेगळे ‘टास्क’ पूर्ण करण्यास सांगितले. ‘टास्क’ पूर्ण केल्यानंतरही मोबदला दिला नाही. संशयितांनी विविध खात्यांवर पैसे भरण्यास सांगून ९४ लाख १३ सहस्र रुपये लुबाडले. या प्रकरणी हर्षल शिंपी यांच्या तक्रारीवरून शहर सायबर पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे.
रुग्णवाहिका चालकाची हत्या करणार्या ४ धर्मांधांना अटक !
नवी मुंबई – नेरूळमधील डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर २६ नोव्हेंबरला रात्री झालेल्या रुग्णवाहिका चालकाच्या हत्याप्रकरणात नेरूळ पोलिसांनी चारही धर्मांध मारेकर्यांना कह्यात घेतले. या आरोपींमध्ये धर्मांध वडील आणि त्यांच्या ३ मुलांचा समावेश आहे. या चौघांनी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या नारळ पाणी विक्रेत्याच्या ‘स्टॉल’ची हानी केली. मृत युवराज सिंह याने नारळपाणी विक्रेत्याला माहिती दिली. याच गोष्टीचा राग आल्याने धर्मांधांनी सिंह याची हत्या केली.
अल्पसंख्य असणारे धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !
समूह विद्यापीठ स्थापन करण्यासाठी मार्गदर्शक सूचना
मुंबई – राज्यातील अनुदानित आणि विनाअनुदानित, तसेच नव्याने स्वायत्त झालेल्या महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांच्या शेकडो जागा रिक्त ठेवून उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने राज्यातील महाविद्यालयांना समूह विद्यापीठ स्थापन करण्यासाठी मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. समूह विद्यापिठे स्थापन करण्यासाठी घेतलेला निर्णय हा केवळ संस्थाचालकांच्या हिताचा ठरणार असल्यानेच त्यासाठी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांवर पुढील काळात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
ज्येष्ठ नागरिकाचे २७ लाख पळवले !
पिंपरी (जिल्हा पुणे) – ज्येष्ठ नागरिकाच्या चेहर्यावर मिरची पूड टाकून त्यांच्याकडील २७ लाख २५ सहस्र ८०० रुपयांची रोकड हिसकावून नेली होती. निगडीतील यमुनानगर येथे १४ ऑक्टोबरला रात्री पावणेअकराच्या सुमारास ही घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी ४ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ११ लाख ३५ सहस्र ४०० रुपयांची रोकड, तसेच इतर मुद्देमाल हस्तगत केला.
अशा चोरांना कठोर शिक्षाच हवी !