बचत गटांच्या उत्पादीत मालासमवेत शेतकर्‍यांच्या मालालाही मॉलमध्ये विक्रीसाठी ठेवण्यास जागा उपलब्ध करून देणार ! – शंभूराज देसाई

शंभुराज देसाई

कराड, ३० नोव्हेंबर (वार्ता.) – नवी मुंबई, ठाणे, वाशी आदी ठिकाणी मोठमोठे मॉल आहेत. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद माझ्याकडेच आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील महिला बचत गटांना सवलतीच्या दरात स्टॉल उपलब्ध करून देण्याचा निर्णय ठाणे जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील शेतकर्‍यांची उत्पादनेही ठेवण्यात येतील, असे आश्वासन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

कराड येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरवण्यात आलेल्या १८ व्या राज्यस्तरीय स्व. यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक आणि पशूपक्षी प्रदर्शनाचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री अन् सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्या वेळी ते बोलत होते.