2nd Maharashtra Mandir Parishad : हिंदु संस्कृतीचे रक्षण होण्यासाठी मंदिरांचे संघटन आवश्यक ! – जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज
द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद
रत्नागिरी, ३० नोव्हेंबर (वार्ता.) : ओझर (पुणे) येथे २ आणि ३ डिसेंबर २०२३ या दिवशी होणार्या द्वितीय राज्यस्तरीय महाराष्ट्र मंदिर पुण्यास परिषदेचे निमंत्रण जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज, जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिणपीठ – नाणीजधाम यांना नाणीज ता.जि. रत्नागिरी येथे महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने देण्यात आले आणि या मंदिर परिषदेसाठी आशीर्वाद घेण्यात आले.
या वेळी आशीर्वचनपर संबोधन करतांना जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज म्हणाले, ‘‘हिंदु संस्कृतीचे रक्षण होण्यासाठी मंदिरांचे संघटन होणे आवश्यक आहे, ही काळाची आवश्यकता आहे. आम्ही पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे परिषदेला प्रत्यक्ष उपस्थित राहू शकलो नाही, तरी आम्ही आमचा संदेश परिषदेसाठी पाठवत आहोत, तो परिषदेमध्ये वाचून दाखवावा.’’