प.पू. भक्तराज महाराज यांचे नारायणगाव येथील शिष्य शशिकांत मनोहर ठुसे (वय ८१ वर्षे ) यांचे निधन !
नारायणगाव (जिल्हा पुणे) – येथील मनोहरबाग (पठार) येथे रहाणारे सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचे शिष्य शशिकांत मनोहर ठुसे यांचे बुधवार, २९ नोव्हेंबर या दिवशी दुपारी २ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात १ मुलगा श्री. आदित्य, २ मुली सुश्री गायत्री शशिकांत ठुसे, सौ. मंजिरी समीर मरकळे असा परिवार आहे. सनातन परिवार ठुसे आणि मरकळे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. ३० नोव्हेंबर या दिवशी सकाळी ९ वाजता मीनानदी तीरावर हरिस्वामी मंदिराजवळ त्यांचे अंत्यविधी होणार आहेत.
त्यागी वृत्तीचे आणि ज्ञानी असलेले शशिकांत ठुसे हे नारायणगाव येथील प्रतिष्ठित व्यक्ती होते. त्यांचा शेतीची अवजारे बनवण्याचा कारखाना होता. व्यवसाय करत वारकरी संप्रदायानुसार साधना करतांना योगायोगाने ते प.पू. भक्तराज महाराज यांच्या संपर्कात आले. त्यानंतर त्यांना अनेक अनुभूती आल्या. त्यांनी प.पू. भक्तराज महाराज यांचे शिष्य म्हणून अनुमाने १० वर्षे मनोभावे सेवा केली. त्यानंतर शशिकांत ठुसे यांनी प.पू. रघुवीर काणे महाराज यांची २५ वर्षांहून अधिक वर्षे सेवा केली. प.पू. काणे महाराज ठुसेकाका यांच्या घरी शेवटपर्यंत राहिले. ठुसेकाका हे सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे गुरुबंधू होत. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या विषयी त्यांच्या मनात पुष्कळ आदर आणि श्रद्धा होती. त्यांनी सनातन संस्थेच्या साधकांना साधना आणि सेवा करण्यासाठी साहाय्य केले.