राजकीय अस्तित्वासाठी होमहवन ?
राजकीय अस्तित्वासाठी निवडणूक आल्यावर नास्तिक आणि हिंदूंच्या देवीदेवतांवर टीका टिप्पणी करणारे हिंदूंच्या देवतांची पूजा, पाठ करतांना दिसत आहेत. राजकीय क्षेत्रातील हीन बुद्धीच्या लोकांना धार्मिक पौराहित्य ठाऊकच नसते. निदान पुरोहित लोकांना तरी धार्मिक पौरोहित्य कसे असते, हे ठाऊक हवे. काही पुरोहित पैशासाठी तेसुद्धा विसरलेले आहेत. राजस्थानमध्ये प्रियांका वाड्रा यांनी होमहवन केले. त्यावरून काही प्रश्न पडतात.
१. हिंदु पद्धतीनुसार कधी एकट्याने होमहवन करतात का ? लग्न झालेले नसेल, तर ठीक आहे; पण लग्न होऊनही एकट्याने होमहवन विधी कसा होतो ?
२. निवडणुकीच्या वेळीच हिंदूंच्या देवता कशा आठवतात ? गांधी कुटुंब हे हिंदु नाही, हे संपूर्ण देशाला ठाऊक आहे.
– श्री. प्रकाश शिंपी, पूर्व मंगळवार पेठ, सोलापूर.