‘सिंहगड इन्स्टिट्यूट’चे संस्थापक मारुति नवले यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंद !
७० लाख रुपयांचा ‘पी.एफ्.’ भरला नसल्याचा आरोप !
पुणे – प्रसिद्ध शैक्षणिक संस्था ‘सिंहगड इन्स्टिट्यूट’चे संस्थापक मारुति नवले यांच्या विरोधात पी.एफ्.मध्ये (भविष्य निर्वाह निधी) अपहार आणि फसवणूक केल्याविषयी कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नवले यांच्या कोंढवा येथील ‘सिंहगड सिटी स्कूल’मधील ११६ कर्मचार्यांच्या मासिक वेतनातून ऑक्टोबर २०१९ ते जून २०२२ या ४ वर्षांची ‘पी.एफ्.’ची रक्कम कपात केली; परंतु ती रक्कम ‘पी.एफ्.’ खात्यामध्ये न भरता स्वत:च्या लाभाकरता वापरली, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील निधी विभागातील राहुल कोकाटे यांनी या प्रकरणी तक्रार प्रविष्ट केली आहे.
तक्रारदाराचे असे म्हणणे आहे की, नवले यांनी कोंढवा येथील ‘सिंहगड सिटी स्कूल’मधील ११६ कर्मचार्यांच्या मासिक वेतनातून ७४ लाख ६८ सहस्र ६३६ रुपयांची कपात केली आहे. त्यातील ३ लाख ७५ सहस्र ७७४ रुपये एवढी रक्कम ‘पी.एफ्.’ खात्यामध्ये जमा केली आहे. उर्वरित ७० लाख ९२ सहस्र ८६२ रुपये हे त्यांनी न भरून कर्मचार्यांची फसवणूक केली आहे.
संपादकीय भूमिकाया प्रकरणी सत्य काय आहे, हे जनतेसमोर आले पाहिजे. |