वाशी येथील मालमत्ता प्रदर्शनात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन
नवी मुंबई – सी.आर्.इ.डी.ए.आय. आणि बी.ए.एन्.एम्. यांच्या वतीने १ ते ४ डिसेंबर या कालावधीत येथील सिडको प्रदर्शन केंद्र येथे २२ वे मालमत्ता प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. या प्रदर्शनात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन कक्ष उभारण्यात येणार आहे, अशी माहिती सनातन संस्थाच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी दिली आहे.
ग्रंथप्रदर्शनात अध्यात्म, साधना, देवतांची उपासना, धर्माचरण, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती, आपत्काळाविषयीची सिद्धता, आयुर्वेद, आरोग्य आदी विषयांवरील ग्रंथ, तसेच सात्त्विक उत्पादने उपलब्ध असणार आहेत. हे मालमत्ता प्रदर्शन पहायला येणार्या सर्वांनी सनातन संस्थेच्या वतीने आयोजित ग्रंथप्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. सकाळी १० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत हे प्रदर्शन चालू असणार असून अधिक माहितीसाठी ९३२०००३५६० या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन सौ. भगत यांनी केले आहे.