मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांच्यावर गुन्हा नोंद !
मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सार्वजनिक सभेत शिवीगाळ केल्याप्रकरणी मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांच्या विरोधात भांडुप पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी दळवी यांना न्यायालयात उपस्थित केले असता त्यांना १२ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
२७ नोव्हेंबर या दिवशी भांडुप येथे शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका मेळाव्यात दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या विरोधात शिवसेनेच्या शिंदे गटाचे उपविभागप्रमुख भूषण पालांडे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती. २९ नोव्हेंबर या दिवशी विक्रोळी येथील रहात्या घरातून पोलिसांनी दत्ता दळवी यांना अटक केले होते.