शाळेत शिक्षक मिळावा, यासाठी आज शिरगाव (देवगड, सिंधदुर्ग) येथे रस्ताबंद आंदोलन होणार !

देवगड : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा (चौकेवाडी, शिरगाव) या शाळेतील अन्य शाळेत पाठवलेल्या शिक्षकांना पुन्हा शाळेत नियुक्त करण्याच्या मागणीसाठी २९ नोव्हेंबर या दिवशी सकाळी १० वाजता शिरगाव बसस्थानक येथे ‘रस्ताबंद’ आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि ग्रामस्थ यांनी देवगड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिली आहे.

चौकेवाडी येथील या शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत वर्ग आहेत. या शाळेतील एका शिक्षकाला दुसर्‍या शाळेत पाठवले आहे. त्यामुळे या शाळेत दोनच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी होत आहे. या शाळेतून अन्य शाळेत पाठवलेल्या शिक्षकाला पुन्हा येथे नियुक्त करावे, यासाठी ऑगस्ट मासात शाळा बंद आंदोलन केले होते. त्या वेळी ‘शिक्षकाची अन्य शाळेतील नियुक्ती रहित केली जाईल’, असे आश्वासन दिले होते; मात्र शिक्षक न आल्याने आंदोलनाची चेतावणी देण्यात आली.

संपादकीय भूमिका

स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतर शाळेत शिक्षक मिळावा यासाठी आंदोलन करावे लागणे हे दुर्दैवी आणि प्रशासनाला लज्जास्पद !