वरवंड-पाटस यात्रा निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी पोलीस सिद्ध !
वरवंड (जिल्हा पुणे) – दौंड तालुक्यातील वरवंड-पाटस यात्रा उत्सव निर्विघ्नपणे आणि शांततेत पार पडण्यासाठी यवत पोलीस सिद्ध झाले आहेत. ‘यात्रेत विघातक कृत्य करणार्यांची गय करणार नाही. कुणी कितीही शक्ती लावा, कायदा मोडला की, मी गुन्हा नोंद करणार’, असा इशारा पोलीस निरीक्षक हेमंत शेगडे यांनी दिला. (पोलिसांनी केवळ इशारा न देता प्रत्यक्ष कृती करावी ! – संपादक)
प्रतिवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. यात्रेत मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने चोरीचे प्रकार घडतात. त्यामुळे महिलांनी मौल्यवान दागिने, तसेच मुले यांवर लक्ष ठेवावे असेही शेगडे यांनी सांगितले. समितीच्या वतीने यात्रा कालावधीत धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.