गॅसवरील कढई वाकडी होऊन उकळते तेल हातावर पडतांना घाटकोपर, मुंबई येथील कु. आदिनाथ बांगर याने अनुभवलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची कृपा !
१. दुकानात कढईतील उकळते तेल शरिरावर न पडता हातावर पडणे आणि त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवणे
‘एकदा मला वडापाव खाण्याची इच्छा झाली; म्हणून मी आणि माझे आजोबा (श्री. बबन वाळुंज, आईचे वडील) आमच्या घराच्या बाजूला असलेल्या वडापावच्या दुकानात वडापाव खायला गेलो. तेथे ‘गॅस’ला जोडलेला एक ‘पाईप’ होता. त्या ‘पाईप’मध्ये माझा पाय अडकला आणि मी पडलो. त्या वेळी गॅसवर असलेली उकळत्या तेलाची कढई वाकडी झाली. ‘कढईतील तेल माझ्या शरिरावर पडेल’, हे लक्षात येताच आजोबांनी ती कढई उचलली. त्यामुळे तेल माझ्या छातीवर न पडता हातावर पडले. हा सर्व प्रसंग घडतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले सूक्ष्मातून त्या ठिकाणी आले आहेत’, असे मला जाणवले.
२. नामजप केल्यामुळे त्रास उणावणे
कढईतील उकळते तेल हातावर पडल्यामुळे मला पुष्कळ त्रास होत होता. घरी आल्यानंतर माझा नामजप आपोआप चालू झाला आणि नामजपामुळे मला होणारा त्रास पुष्कळ प्रमाणात उणावला. गुरुदेवांच्या कृपेमुळे ही अनुभूती आल्याने त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो !’
– कु. आदिनाथ दिलीप बांगर (वय १३ वर्षे), घाटकोपर, मुंबई. (२७.५.२०२२)
|