हसतमुख अन् सर्वांशी जवळीक साधणारे चि. राजेंद्र दुसाने आणि प्रेमळ अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या ६० टक्के आध्यात्मिक पातळीच्या चि.सौ.कां. दीपाली माळी !
२९.११.२०२३ या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ सेवा करणारे चि. राजेंद्र दुसाने आणि रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ सेवा करणार्या चि.सौ.कां. दीपाली माळी (आध्यात्मिक पातळी ६० टक्के) यांचा चोपडा (जिल्हा जळगाव) येथे शुभविवाह होत आहे. त्यानिमित्त त्यांच्या सहसाधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
चि. राजेंद्र दुसाने आणि चि.सौ.कां. दीपाली माळी यांना शुभविवाहानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
भावपूर्ण सेवा करून संतांचे मन जिंकणारे चि. राजेंद्र दुसाने !
‘चि. राजेंद्र दुसाने मागील २ वर्षांपासून माझ्यावर पंचकर्म, बिंदूदाबन इत्यादी उपचार करत आहेत. मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. शिकण्याची वृत्ती : राजेंद्रदादांनी बिंदूदाबन, पंचकर्म इत्यादी उपचारपद्धती शिकून घेतल्या आहेत. ते नवीन उपचारपद्धती जिज्ञासेने शिकून घेतात आणि रुग्ण साधकांवर तळमळीने उपचार करतात.
२. परिपूर्णता आणि कुशलता : दादा पंचकर्म शास्त्रोक्त पद्धतीने करतात. तेथे ते कोणतीही सवलत न घेता किंवा पर्यायी मार्ग न वापरता परिपूर्ण उपचार करतात. शिकलेल्या पद्धतीनुसारच ते शांतपणे, कुशलतेने अन् योग्य प्रकारे उपचार करतात.
३. तत्परता आणि प्रेमभाव : वयोमानानुसार मला अकस्मात् खांदेदुखी, पायांत गोळे येणे किंवा इतर शारीरिक समस्या निर्माण होतात. त्या वेळी दादा माझ्यावर उपचार करण्यासाठी तत्परतेने येतात. त्यांनी उपचार केल्यावर माझ्या वेदना न्यून होतात आणि मला बरे वाटते. त्यामुळे मला लगेच माझ्या सेवेला आरंभ करता येतो. हे सर्व दादांचा साधकांप्रती असलेला प्रेमभाव आणि आपुलकी यांमुळे होते.
४. भावपूर्ण सेवा करणे : दादा रुग्ण साधकांवर उपचार करत असतांना नामजप करतात आणि ‘ती गुरुसेवा आहे’, असा भाव ठेवतात. ते भावपूर्ण सेवा करत असल्यामुळे रुग्णाच्या वेदना न्यून होऊन त्यांना लगेच बरे वाटते. बर्याच वेळा ‘दादांच्या माध्यमातून गुरुदेवच माझ्यावर उपचार करत आहेत’, असे वाटून माझी भावजागृती होत असते.
५. जाणवलेला पालट : पूर्वी चुका स्वीकारण्यास दादांच्या मनाचा संघर्ष व्हायचा, तसेच कठीण परिस्थिती आली, तर ते अस्थिर व्हायचे. मागील ६ मासांपासून ते त्यांच्याकडून झालेल्या चुका स्वीकारून त्या सुधारण्यासाठी प्रयत्न करतात, तसेच स्थिर राहून आणि परिस्थिती स्वीकारून शांतपणे सेवा करतात.
‘राजेंद्रदादांमुळे माझ्यासारख्या रुग्ण साधकांना पुष्कळ साहाय्य होते आणि आमचा शारीरिक त्रास दूर झाल्यामुळे आम्हाला सेवा करता येते’, त्याबद्दल राजेंद्रदादांचे कितीही कौतुक केले आणि आभार मानले, तरी ते अल्पच आहेत.
‘दादांचा विवाह होत आहे’, हे कळल्यावर मला आनंद झाला. ‘त्यांचे वैवाहिक जीवन आनंदात जावो आणि भावी पती-पत्नी एकमेकांना साधनेत पूरक होवोत’, अशी शुभेच्छा मी व्यक्त करतो, तसेच ‘त्यांची साधना गतीने होऊन आध्यात्मिक प्रगती होवो’, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.’
– (पू.) शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे संत, वय ७७ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (८.११.२०२३) ०
चि. राजेंद्र दुसाने यांची देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१. सौ. काव्या चेऊलकर, सौ. उमा कदम आणि कु. रेणुका वळंजु
१ अ. ‘राजेंद्रदादा लहान-मोठ्या सर्वांशी आदराने आणि नम्रतेने बोलतो.
१ आ. जवळीक साधणे : दादाची देवद आश्रमातील सर्व वयोगटांतील साधकांशी जवळीक आहे. त्याने त्याच्या नातेवाइकांनाही जोडून ठेवले आहे. तो अधूनमधून भ्रमणभाषवरून त्यांची आपुलकीने विचारपूस करतो. साधकांच्या कुटुंबियांशीही तो सहज जवळीक करतो.
१ इ. परिस्थिती स्वीकारणे : त्याला सेवा करतांना अडचणी आल्या, तरी तो त्याविषयी कधीही गार्हाणे करत नाही. आहे त्या परिस्थितीत तो जमेल तशी सेवा करत रहातो.
१ ई. स्वतःला पालटण्याची तळमळ : पूर्वी त्याला ‘संतसेवेत चुका होतील’, याची सतत भीती असायची. त्यामुळे तो त्यांच्याशी समन्वय करणे टाळायचा; पण त्याला याची जाणीव करून दिल्यावर त्याने त्यावर चिकाटीने प्रयत्न केले.
१ उ. संतांप्रती भाव : एकदा आश्रमात साधकसंख्या अल्प असतांना सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी त्याला सांगितले, ‘‘कोणत्याही सेवेला ‘नाही’ म्हणायचे नाही.’’ तेव्हा त्याने संतांचे आज्ञापालन करत वैयक्तिक गोष्टींना अल्प प्राधान्य देऊन आश्रमातील अन्य सेवांना प्राधान्य दिले. यातून त्याला आनंद मिळत असल्याचेही तो आम्हाला सांगायचा.
१ ऊ. गुरुदेवांवरील (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावरील) श्रद्धेमुळे त्याला ‘गुरुदेव अडचणी सोडतील’, याची निश्चिती असते.’
२. श्री. वैभव कणसे, श्री. पुष्कर अरगडे आणि श्री. प्रशांत कावरे
अ. ‘राजेंद्रदादा नेहमी हसतमुख असतो. तो सर्वांशी मनमोकळेपणाने बोलतो.
आ. दादामधील प्रेमभावामुळे आम्हाला त्याचा मोठ्या भावाप्रमाणे आधार वाटतो.
इ. दादा संतसेवा करतांना ‘गुरुदेवांचीच सेवा करत आहे’, असा भाव ठेवतो. त्याने भावपूर्ण सेवा करून संतांची मने जिंकली आहेत.’
चि.सौ.कां. दीपाली माळी यांची रामनाथी (गोवा) येथील साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१. कु. गीतांजली काणे
१ अ. निर्मळ मन : ‘दीपालीचे मन निर्मळ आहे. एखादी गोष्ट पटली नाही, तर ती लगेच सांगते. तिच्या निर्मळतेमुळे ती सगळ्यांनाच हवीहवीशी वाटते. तिला आपल्या मनातले सर्वकाही मनमोकळेपणाने सांगता येते.
१ आ. प्रेमभाव : तिच्या प्रेमभावामुळे तिला सगळ्यांविषयी आणि इतरांना तिच्याविषयी आपलेपणा जाणवतो. त्यामुळे तिला पुष्कळ मैत्रिणी आहेत.
१ इ. इतरांना साहाय्य करणे : एका विवाहप्रसंगी तिच्याकडे वधूला साहाय्य करण्याची सेवा होती. त्या साधिकेचे नातेवाईक आश्रमात प्रथमच आले होते. त्यांना आश्रमातील सर्वच अनोळखी होते. त्या वेळी ‘त्यांना निवास, भोजन इत्यादींविषयी निरोप देणे, साधिकेला साहाय्य करणे, आश्रमातील साधकांशी समन्वय ठेवणे’ इत्यादी सेवा तिने अत्यंत मनापासून आणि झोकून देऊन केल्या. दीपालीने प्रेमाने केलेल्या साहाय्यामुळे त्या साधिकेच्या नातेवाईकांना तिच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.
१ ई. दीपाली सेवा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करते. ती हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’ आणि प्रसारसाहित्य यांची संरचना करण्याची सेवा लवकर शिकली.
१ उ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव : ती तिच्याकडील ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथाच्या मुखपृष्ठावरील परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्रासमोर सतत आत्मनिवेदन करत असते. तिच्या स्वप्नात अधूनमधून गुरुदेव आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ येतात. ‘ते कधी कधी स्वप्नात मार्गदर्शन करत आहेत’, असे तिला जाणवते. नामजपादी उपाय करतांना तिला सुंदर भावदृश्ये दिसतात. तिला भावजागृतीचे सुंदर प्रयोग सुचतात.
१ ऊ. जाणवलेला पालट : पूर्वी कुणी तिची चूक दाखवून दिली, तर तिला वाईट वाटायचे आणि तिच्या मनाचा संघर्ष व्हायचा. आता ती सातत्याने इतरांना समजून घेण्याचा आणि चूक स्वीकारून मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.
‘अशा गुणी साधिकेस गुरुस्मरणाचा आनंद सतत मिळो आणि तिची सर्वांगीण उन्नती होवो’, अशी श्री गुरुचरणी भावपूर्ण प्रार्थना आहे.’
२. कु. वर्षा जबडे आणि सौ. प्रेरणा हजारे
२ अ. भाव
१. ‘दीपालीमध्ये श्रीकृष्णाप्रती पुष्कळ भाव आहे. तिच्याकडे राधा आणि कृष्ण यांच्या मूर्ती आहेत. ती त्यांची मनोभावे पूजा करते आणि त्यांच्या अनुसंधानात रहाते.
२. तिचा विवाह ठरल्यावर ती घरी जाण्यापूर्वी रामनाथी आश्रमात तिचे केळवण होते. त्या वेळी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका तेथे उपस्थित होते. तेव्हा त्यांना साष्टांग नमस्कार केल्यावर ती काही वेळ कृतज्ञताभावात होती. ‘तिला सद्गुरु काकांमध्ये परात्पर गुरु डॉक्टरांचे दर्शन झाले’, असे तिने सांगितले.’
३. कु. वर्षा जबडे
३ अ. मनमोकळेपणा : ‘एखाद्या प्रसंगात तिच्या मनाचा संघर्ष झाला, तर ती त्याविषयी दायित्व असणारे साधक आणि व्यष्टी साधनेचा आढावा घेणारे साधक यांच्याशी मनमोकळेपणाने बोलते.
३ आ. आश्रमस्तरावरील विविध सेवा करणे
१. काही वर्षांपूर्वी तिच्याकडे आश्रम स्वच्छतेचे नियोजन करण्याची सेवा होती. ही सेवा करतांना ती साधकांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करत असे. या सेवेचा ताण आल्यावर ती देवाचे साहाय्य घेऊन, तसेच दायित्व असणार्या साधकांशी बोलून अडचणी सोडवत असे. या सेवेमुळे तिने तिच्या ‘संकोच वाटणे’, या स्वभावदोषावर मात करण्याचा प्रयत्न केला.
२. दीपालीचे अक्षर सुंदर असल्याने ती सणांच्या वेळी फलकावर सणांच्या संदर्भातील लिखाण आणि इतर वेळी सूचनांचे लिखाण करण्याची सेवा कौशल्याने करते.
३ इ. संतसेवा भावपूर्ण करणे : दीपाली संतसेवा मनापासून आणि भावपूर्ण करते. एखाद्या वेळी तिला पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळआजी (सनातनच्या ११७ व्या संत, वय ८४ वर्षे) यांच्याकडे सेवेला जायला जमले नाही, तर पू. आजी अन्य साधिकांकडे दीपालीची विचारपूस करतात. पू. भाऊकाकांच्या (सनातनचे १०१ वे संत आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधू (वय ८८ वर्षे) यांच्या)) पत्नी सौ. सुनीती आठवलेकाकू यांनाही दीपालीने केलेली सेवा पुष्कळ आवडते. त्यामुळे त्या सेवेसाठी दीपालीची वाट पहात असतात.’
४. श्री. चेतन हरिहर
४ अ. भावाच्या स्तरावर स्वभावदोषांवर मात करणे : ‘एका प्रसंगात ताईच्या मनाचा पुष्कळ संघर्ष झाला होता. व्यष्टी साधनेचा आढावा घेणार्या साधकाने ताईला संघर्ष अल्प करण्यासाठी स्वयंसूचना द्यायला सांगितले होते. ताईने तसे प्रयत्न करूनही तेवढा परिणाम झाला नाही. त्यानंतर देवाचा धावा करून आणि देवाला शरण जाऊन प्रार्थना केल्यावर ताई त्या प्रसंगातून बाहेर पडली.’
५. श्रीमती मीरा करी
अ. ‘दीपाली नेहमी हसतमुख असते.
आ. दीपाली अल्पाहार सेवेचे नियोजन करतांना ‘वयस्कर साधकांना कोणती सेवा जमू शकते ?’, हे समजून घेते आणि त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार सेवा देते. त्यामुळे साधकांना अल्पाहार सेवा करतांना ताण येत नाही.’
६. सौ. सुजाता रेणके
अ. ‘ऐन वेळी तिने दिलेल्या सेवा करणे आम्हाला जमत नसले, तरी ती सकारात्मक रहाते.’
७. श्रीमती सुचेता जठार
अ. ‘दीपाली पुष्कळ मनमिळाऊ आहे.
आ. ती गुजराती पत्रकांची संरचना सहजतेने करते. त्यात तिचा कर्तेपणा मुळीच नसतो. ‘सर्व श्रीकृष्णच करून घेत आहे’, असा तिचा भाव असतो.’
८. कु. भाग्यश्री धांडे
अ. ‘तिला विज्ञापने बनवायची आवड आहे. ही सेवा करतांना ती या सेवेशी एकरूप होते. ताईने मला ही सेवा शिकवली. तेव्हा तिने मला त्यातील बारकावे समजावून सांगितले. त्यामुळे मला सेवेतील आनंद घेता आला.
आ. ती माझ्याकडून होत असलेल्या चुकांची मला जाणीव करून देते, तसेच ‘त्या चुकांवर मात कशी करू शकतो ?’, याविषयी सहजतेने सांगते.
इ. ती आम्हाला ‘भावजागृतीचे प्रयत्न कसे करायला हवेत ?’, हे सांगते.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : २८.१०.२०२३) ०
गुरुकृपा से जीवनभर आनंद में रहना।एक छोटी सी नन्हीं सी गुडिया थी। प्यारी सी रानी बिटिया थी। साधक-संतों के सत्संग में। ईश्वर के आंतरिक सान्निध्य में। लाडो हमारी बहुगुणी। बनेगी अब नए घर की रोशनी। साधना के नन्हें पौधे को संभालना। ऐ सखी, मन से प्रार्थना-नामजप करना। हम सबकी यही प्रार्थना, जीवन में भरी हो खुशियां। पर कभी आए जो दुख का झोंका। तुम्हारे-हमारे संग की यादें भीनी-भीनी। भुला न देना ये स्मृतियां खट्टी-मीठी। जीवन रहस्य हम यही बतलाएंगे। गुरुचरण सदैव तुम्हारे साथ रहेंगे। टीप – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ’ – कु. निधि देशमुख, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.११.२०२३) ० |