लोकशाहीविरोधी मशिदींना कह्यात घेऊन पाडले पाहिजे ! – जिमी एकेसन, सोशल डेमोक्रेट्स पक्षाचे नेते, स्विडन
|
स्टॉकहोम (स्विडन) – ज्या मशिदींमध्ये लोकशाहीविरोधी, स्विडनविरोधी आणि ज्यूविरोधी प्रचार केला जात आहे, अशा मशिदींना कह्यात घेऊन त्यांना पाडले पाहिजे, असे विधान येथील स्विडन सोशल डेमोक्रेट्स पक्षाचे नेत जिमी एकेसन यांनी एका कार्यक्रमात भाषण करतांना केले.
यावर स्विडनचे पंतप्रधान क्रिस्टर्सन यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, मला वाटते की, स्वतःला व्यक्त करण्याची ही एक अवमानकारक पद्धत आहे. हा एक ध्रुवीकरणाचा प्रयत्न आहे. अशा वक्तव्यांमुळे आपली आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिमा मलीन होते. स्विडनमध्ये धर्मिक स्थळांना पाडले जात नाही. एक समाज म्हणून आपल्याला हिंसेच्या विरोधात लढले पाहिजे. ही लढाई लोकशाही आणि कायद्याच्या चौकटीत राहून लढली पाहिजे.