उथळ पाण्याच्या खळखळाटाप्रमाणे असलेले नास्तिकतावादी शाम मानव !
‘उथळ पाण्याला खळखळाट फार’, या म्हणीनुसार ‘जे पाणी फार कमी, म्हणजेच उथळ असते, त्याचा खळखळाट म्हणजे प्रचंड आवाज येतो’, ही म्हण ज्यांना तंतोतंत लागू पडते ते अर्थात् नास्तिकतावादी शाम मानव. यासंबंधी काही सूत्रे पुढे देत आहे.
१. पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या कार्यक्रमाला सर्वसाधारण ५ लाख लोक जमत असतील, तर शाम मानवांच्या कार्यक्रमाला किमान ५०० माणसे तरी जमली पाहिजेत. जर शाम मानव हे संत-महापुरुषांच्या विरोधात पुराव्यांसह बोलत असतील, तर कुतूहल म्हणून दीड लाख लोक तरी त्यांच्या कार्यक्रमाला जमले पाहिजेत; पण तसे होत नाही, म्हणजे लोकशाहीच्या संख्याबळाच्या तत्त्वानुसार ही शाम मानव चुकीचे ठरतात. तार्किक सिद्धांतानुसार पाहिले, तरी ४ ते ५ लाख लोक मूर्ख आणि ५०० किंवा ५ सहस्र शहाणे हेही तर्कशास्त्रात बसणारे नाही. याचाच अर्थ शाम मानव चुकीचे ठरतात.
२. शाम मानव म्हणतात त्याप्रमाणे, ‘मिसाईल मॅन’ असा ज्यांचा उल्लेख होतो, असे वैज्ञानिक दृष्टीचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हेही सत्य साईबाबांच्या दर्शनाला गेले होते. मग यामध्ये राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यापेक्षा शाम मानवांना अधिक कळते का ? आणि जर कळत असेल, तर त्यांनी धाडस करून डॉ. कलाम यांची भेट घेऊन त्यांच्याकडून खुलासा किंवा मार्गदर्शन घ्यावयास पाहिजे होते.
३. शेवटचे सूत्र, म्हणजे खरोखर शाम मानवांच्या भाषेत हे तथाकथित बाबा बुवा हे समाजाची फसवणूक करून अंधश्रध्दा पसरवत असतील, तर शाम मानव यांना लोकशाहीच्या अन्य वैध मार्गांचा अवलंब करता आला असता.
काहीही झाले, तरी त्यांना यातील काहीच करून दाखवता आलेले नाही, याची मात्र लोकांना निश्चितच प्रचीती आली असेल, यात शंका नाही.
– श्री. दत्तात्रय पटवर्धन (वय ७० वर्षे), कोलगाव, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. (२४.११.२०२३)