सनातन-निर्मित देवतांची चित्रे, सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांतील चैतन्यामुळे साधना अन् सेवा करण्यास आरंभ होणे
१. सनातन-निर्मित देवतांच्या चित्रांतून तेजतत्त्व आणि चैतन्य जाणवणे
‘जेव्हा मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ध्यानमंदिरातील देवतांची चित्रे पाहिली, तेव्हा मला त्या चित्रांत ‘राम, कृष्ण, शिव, गणपति, श्री दुर्गादेवी, श्री लक्ष्मीदेवी आणि श्री सरस्वतीदेवी यांचे तेजतत्त्व आणि चैतन्य’ जाणवत होते. सर्व चित्रांकडे बघून ‘त्या देवता माझ्याकडे बघत आहेत आणि बोलत आहेत’, असे मला जाणवले.
२. सनातनच्या सात्त्विक उत्पादनातून चैतन्य मिळणे आणि साधना चालू केल्यावर त्यातून आनंद मिळणे
मी सनातनची सर्व उत्पादने घेतली, उदा. उदबत्ती, कापूर, अष्टगंध, कुंकू, साबण. तेव्हा मला त्या उत्पादनांमधूनही चैतन्य जाणवले. तेव्हा ‘मन एकाग्र होणे, नामजप आणि प्रार्थना करतांना चित्ताची एकाग्रता, उत्साह, आनंद अन् शांती’, असे मला जाणवायला लागले. तेव्हापासून मी ती उत्पादने नेहमी वापरायला लागले आणि त्यातून माझी साधना चालू झाली. माझा नामजप आणि प्रार्थना होऊन मला आनंद मिळू लागला.
३. सनातनच्या ग्रंथांच्या वाचनातून प्रत्येक कृतीमागील शास्त्र कळणे, साधना आणि ग्रंथ वितरणाची सेवा चालू करणे
मी सनातनचे ग्रंथ विकत घेतले आणि त्यांचे वाचन चालू केले. त्यामधून ‘साधना का करावी ? प्रत्येक कृतीमागील शास्त्र काय आहे ?’ याविषयी माझ्यात उत्सुकता निर्माण झाली. मला ‘प्रत्येक कृतीमागील शास्त्र काय आहे ?’, हे कळले. तेव्हा मला अजून आनंद मिळाला. याविषयी इतरांनाही कळावे; म्हणून मी ग्रंथ वितरण, ग्रंथ प्रदर्शन लावणे ही सेवा करू लागले. असा माझ्या सेवेचा आरंभ झाला.
गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) अशीच माझ्याकडून साधना आणि सेवा करून घ्यावी, अशी प्रार्थना आहे. हे सर्व गुरुदेवांनी माझ्याकडून लिहून घेतले. त्याबद्दल गुरुचरणी कृतज्ञता.’
– सौ. गीता कुशावाह, श्रद्धा गार्डन, चिंचवड, पुणे. (२६.३.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |