भारत आणि कॅनडा यांच्यातील संघर्षाचे मूळ कारण अन् मुत्सद्देगिरीची आवश्यकता !
‘कॅनडाच्या भूमीवर शीख फुटीरतावाद्यांच्या जीवघेण्या गोळीबाराशी भारत सरकारचा संबंध असू शकतो’, या कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या अलीकडील दाव्यामुळे द्विपक्षीय संबंध बिघडले आहेत. सध्याचा राजनैतिक गोंधळ जरी थोडा ओसरला असला, तरी कॅनडाने हिंसक फुटीरतावादावर लगाम घालण्यास नकार दिल्याने भारताशी त्याचा द्विपक्षीय तणाव वाढत जाणार आहे.
१. शीख फुटीरतावादी कारवाया द्विपक्षीय संबंधांना बिघडवणार्या !
कॅनडा आणि भारत यांच्यात चालू असलेल्या राजनैतिक भांडणाप्रमाणे क्वचितच दोन प्रमुख लोकशाहींमध्ये असे भांडण दिसून येते. पारंपरिक मैत्रीपूर्ण संबंध आधीच सर्वांत निम्न स्तरावर असतांना दोन्ही बाजू आता मध्यस्थ म्हणून कॅनडाचे सहयोगी आणि भारतीय भागीदार अमेरिकेचा वापर करून संघर्ष अधिक खालच्या स्तरावर जाऊ नये; म्हणून प्रयत्न करत आहेत; परंतु सध्याचा राजनैतिक गोंधळ न्यून झाला, तरीही कॅनडाची त्याच्या भूभागावरील शीख फुटीरतावादी कारवायांच्या प्रती असलेली सहानुभूती द्विपक्षीय संबंधांना बिघडवत रहाणार !
२. कॅनडाचे आरोप हास्यास्पद
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना जून २०२३ मध्ये हरदीपसिंह निज्जर या शीख फुटीरतावादी आणि कॅनेडियन नागरिकावर कॅनडाच्या भूमीवर झालेल्या जीवघेण्या गोळीबारामध्ये भारत सरकारचा ‘संभाव्य सहभाग’ असण्याविषयी ‘विश्वासार्ह आरोप’ केल्याने सध्याचा वाद चालू आहे. भारत सरकारने या आरोपाविषयी कॅनडाला फटकारतांना मागणी केली की, कॅनडाने आपले भारतातील राजनैतिक कर्मचारी कमी करावेत, कॅनेडियन लोकांसाठी नवीन व्हिसा स्थगित करावा आणि कॅनडावर त्याच्या ‘आतंकवाद्यांचे सुरक्षित आश्रयस्थान’, या स्थितीपासून लक्ष हटवण्यासाठी कॅनडा ‘हास्यास्पद’ आरोप करत आहे, असा आरोप केला.
३. स्वतंत्र खलिस्तानसाठी होत असलेल्या कारवाया !
निज्जर हा कॅनडात रहाणारा एकमेव शीख फुटीरतावादी नव्हता. खरे तर हा देश ‘खलिस्तान’ किंवा स्वतंत्र शीख मातृभूमीसाठीच्या लढाईचे ‘जागतिक केंद्र’ म्हणून उदयास आला आहे. अँग्लोस्फियरमध्ये विशेषत: कॅनडामध्ये केंद्रित असलेल्या शीख डायस्पोरामधील फुटीरतावादी अल्पसंख्यांक आहेत. भारतात रहाणारे शीख, जे भावनावश होऊन सांगतात की, त्यांना ‘भारतीय असल्याचा अभिमान आहे, ते शीख फुटीरतावादी कारणाचे समर्थन करत नाहीत.’
ब्रिटीश कोलंबिया हे त्यांचे कार्य करण्याचे मूळ स्थान असल्याने फुटीरतावादी राजकीय हिंसाचाराचा गौरव करणारी करणारी एक जोरदार मोहीम राबवत आहेत. उदाहरणार्थ त्यांनी भारतीय मुत्सद्दींच्या हत्येचे समर्थन करणारे छायाचित्रांसह होर्डिंग्ज उभारले आहेत. कारागृहात टाकलेल्या अथवा मारल्या गेलेल्या आतंकवाद्यांना ‘हुतात्मा’ म्हणून सन्मानित केले आहे. एक फलक उभारून त्यावर भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचे पुन्हा प्रक्षेपण केले, तसेच एक स्टेज उभारून त्यावर कॅनडातील भारतीय राजनैतिक संबंधांविषयीचे प्रसंग दर्शवण्यात आले होते. त्यांनी कॅनडात खलिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी सार्वमतही घेतले आहे.
४. पंतप्रधान मोदी यांनी अवलंबलेले धोरण आणि कॅनडाचे आरोप !
कॅनडा फुटीरतावादाला आळा घालण्यासाठी टाळाटाळ करत असल्यामुळे भारताची चिडचिड होत आहे. एका शीख आतंकवाद्याने भेटीवर आलेल्या एका भारतीय राज्य कॅबिनेट मंत्र्याच्या हत्येच्या प्रयत्नानंतर कॅनडाच्या तुरुंगात अनेक वर्षे काढली होती आणि त्याला कॅनडाच्या अतिथींच्या या सूचीत ज्या वेळी समाविष्ट केल्याचे ज्ञात झाले, त्या वेळी वर्ष २०१८ मधील ट्रुडो यांनी भारताला दिलेली पहिली अधिकृत भेट आपत्तीत पालटली गेली. नवी देहलीत सप्टेंबरमध्ये झालेल्या ‘जी-२०’ शिखर परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंसक आतंकवाद्यांविषयी नरम धोरण राखल्याकारणाने ट्रुडो यांची कडक शब्दात खरडपट्टी काढली.
या तणावाच्या पार्श्वभूमीवरच ट्रुडो यांनी निज्जर यांच्या हत्येविषयी आरोप केले. जेव्हा देशांनी परदेशी दलालाच्या मृत्यूशी संबंध जोडला, उदाहरणार्थ वर्ष २०१० मध्ये जेव्हा दुबई पोलीस प्रमुखांनी ‘मोसाद’वर (इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणेवर) स्थानिक पंचतारांकित हॉटेलमध्ये एका हमास कमांडरला मारल्याचा आरोप केला, तेव्हा त्यांनी सामान्यत: व्हिडिओ, ऑडिओ किंवा फॉरेन्सिक पुरावा सादर केला. त्यांनी अनेकदा परदेशी दलाल प्रतिनिधित्व करत असलेल्या सरकारला दोष देण्याचे टाळले आहे.
याउलट ट्रुडो पुरावे सादर न करता थेट भारत सरकारवर दोषारोप करतात. ते म्हणतात की, आरोप विश्वासजनक बुद्धीमत्तेवर आधारित आहेत. वरकरणी पहाता ‘फाईव्ह आइज’ (ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स); परंतु माहिती घोषित करण्यास किंवा ती भारतीय अधिकार्यांशी वाटून घेण्यास नकार देतात.
ट्रुडो यांनी कॅनडाचे विरोधी पक्षनेते आणि प्रिव्ही कौन्सिलचे सदस्य पियरे पॉईलीव्हरे यांनाही कोणतीही सत्य गोष्ट सांगितली नाही आणि ब्रिटीश कोलंबियाच्या पंतप्रधानांच्या म्हणण्यानुसार ज्या प्रांतात ही हत्या झाली होती, त्यांना या प्रकरणासंबंधी मिळालेल्या गुप्तचर माहितीमध्ये इंटरनेटवर शोध करणार्या लोकांसाठी जी माहिती उपलब्ध होती, तीच समाविष्ट केली होती.
५. खलिस्तान्यांच्या प्रभावामुळे कॅनडाच्या सुरक्षिततेवर गंभीर परिणाम !
या प्रकरणात अद्याप एकालाही अटक झालेली नाही, याचे अनेकांना आश्चर्य वाटत आहे, तसेच कॅनडाची शक्तीशाली; परंतु दायित्वशून्य गुप्तचर यंत्रणा आपल्या स्वत:च्या परराष्ट्र धोरणावर कितपत नियंत्रण ठेवते, याविषयीही त्यांना आश्चर्य वाटते. कोणत्याही परिस्थितीत शीख कट्टरपंथियांचा कॅनडामध्ये खरा प्रभाव आहे, यात शंका नाही. निधी देणारेही यांत सामील आहेत. न्यू डेमॉक्रेटिक पक्षाचे शीख नेते आणि खलिस्तानचे समर्थक जगमीत सिंह यांच्या साहाय्याने ट्रुडो स्वतःचे सरकार चालवत आहेत. ट्रुडो सरकारच्या माजी परराष्ट्र धोरण सल्लागाराच्या मते ट्रुडोंना शीख समुदायाची मते गमवायची नसल्यामुळे त्यांनी आतंकवाद्यांना होणारा वित्तपुरवठा रोखण्यासाठी कारवाई केली नाही.
कॅनडाने आता शीख आतंकवाद्यांनी निर्माण केलेल्या धोक्यामुळे जागृत झाले पाहिजे. अमली पदार्थांतून मिळणारा लाभ आणि ब्रिटीश कोलंबियात बंदुकांची सहज उपलब्धता यांमुळे खलिस्तान्यांची आपांपसातील भांडणे वाढली आहेत. शीख आतंकवादी, अमली पदार्थांचा व्यापार आणि गुंडांच्या हत्या यांचे अस्थिररित्या एकत्रित येणे यांचा कॅनडाच्या सुरक्षिततेवर गंभीर परिणाम होत आहेत.
६. दोन्ही देशांनी समस्यांच्या निराकरणासाठी प्रभावी मुत्सद्देगिरीचा वापर करावा !
केवळ कॅनेडियनच धोक्यात नाहीत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचे वडील आणि तत्कालीन पंतप्रधान पियरे ट्रुडो यांच्या काळात आतंकवादासाठी भारताला हव्या असलेल्या शीख आतंकवाद्यांना लगाम घालण्यास किंवा त्यांचे प्रत्यार्पण करण्यास अप्रत्यक्ष मनाईच केली होती. कॅनडाच्या अनिच्छेमुळे वर्ष १९८५ मध्ये एअर इंडियाच्या उड्डाणांना लक्ष्य करून २ बाँबस्फोट झाले. त्यातील एका आक्रमणामध्ये ३२९ प्रवासी ठार झाले, ज्यात बहुतेक प्रवासी भारतीय वंशाचे होते. टोरोंटोहून उड्डाण करतांना दुसरा बाँब चुकल्यामुळे टोकियोच्या नारिता विमानतळावर सामान हाताळणार्या २ कर्मचार्यांचा मृत्यू झाला. खलिस्तानी आतंकवाद्यांनी तलविंदर सिंह परमारचा उदो-उदो चालू ठेवला. परिणामी २ वेगळ्या कॅनेडियन चौकशीत बाँबस्फोटामागील सूत्रधार म्हणून ओळखल्या गेलेल्या आतंकवादी इतिहासाची पुनरावृत्ती होण्याचा धोका आहे.
एअर इंडियाच्या आक्रमणामुळे निर्माण झालेल्या जुन्या जखमा पुन्हा उघडून, ट्रुडो यांच्या आरोपांमुळे विखंडित आणि अत्यंत ध्रुवीकरण झालेल्या भारतात दुर्मिळ राष्ट्रीय सहमत सिद्ध झाले आहे. अनेकांनी भारत सरकारवर त्या कृती संदर्भात कॅनडावर सतत दबाव आणण्याची मागणी केली आहे; परंतु अधिक कटुता आणि आरोपांमुळे द्विपक्षीय संबंध पूर्वीसारखे प्रस्थापित होणे कठीण आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रभावी मुत्सद्देगिरीचा वापर केला पाहिजे.
– प्रा. ब्रह्मा चेलानी, परराष्ट्र धोरणांचे विश्लेषक, नवी देहली.
(प्रा. ब्रह्मा चेलानी हे ‘सेंटर फॉर पॉलिसी रिचर्स’ या केंद्रात ‘स्ट्रॅटेजिक स्टडीज’ (धोरणात्मक अभ्यास) या विषयाचे प्राध्यापक आहेत. त्यांना बर्लिन (जर्मनी) येथील रॉबर्ट बॉश अकादमी ही शिष्यवृत्ती मिळाली असून त्यांनी एकूण ९ पुस्तके लिहिली आहेत.) (साभार : www.chellaney.net)