उर्दू शाळांमध्ये अरबी भाषा शिकणे सक्तीचे करण्याची मागणी !
पुणे – ‘ऑल इंडिया उलेमा बोर्डा’च्या (मंडळाच्या) कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये उर्दू शाळांमध्ये अरबी भाषा शिकणे सक्तीचे करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती बोर्डाच्या वक्फ पक्षाचे अध्यक्ष सलीम सारंग यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बैठकीमध्ये घेण्यात आलेले निर्णय खालील प्रमाणे
१. शिक्षणामध्ये मुसलमानांना ५ टक्के आरक्षणाचे प्रावधान कृतीत आणावे अन्यथा मुसलमान रस्त्यावर येऊन आंदोलन करतील.
२. मुसलमान समाजाच्या मूलभूत गरजांकडे ‘ऑल इंडिया उलेमा बोर्ड’ डोळेझाक करू शकत नाही.
३. आखाती देशात नोकरीसाठी अरबी भाषेचे ज्ञान ही अतिरिक्त गुणवत्ता मानली जात असल्याने राज्यातील उर्दू माध्यमाच्या सर्व शाळांमध्ये हा स्वतंत्र आणि सक्तीचा विषय करावा.