न्यूयॉर्क (अमेरिका) येथील गुरुद्वारात खलिस्तान्यांकडून भारताचे राजदूत संधू यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न !
निज्जर याच्या हत्येत संधू यांचा सहभाग असल्याचा केला आरोप !
न्यूयॉर्क (अमेरिका) – येथे गुरुनानक जयंतीनिमित्त गुरुद्वारामध्ये गेलेले भारताचे राजदूत तरनजीत सिंह संधू यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न खलिस्तानवादी शिखांनी केला; मात्र अन्य शिखांनी याला विरोध करत संधू यांचे रक्षण केले. ‘सिख फॉर जस्टिस या खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंतसिंह पन्नू याने खलिस्तान्यांना यासाठी भडकावले होते.
सौजन्य रिपब्लिक वर्ल्ड
भारतीय राजदूत तरनजीत सिंह संधू गुरुद्वारात आल्यानंतर खलिस्तान्यांनी त्यांना हरदीपसिंह निज्जर यांच्या हत्येविषयी प्रश्न विचारण्यास चालू केले. त्यांनी निज्जर याच्या हत्येत संधू यांचा हात असल्याच आरोप करत संधू यांना मारहाण करण्याचाही प्रयत्न होता. त्याच वेळी अन्य शिखांनी संधू यांचा बचाव केला. यानंतर संधू यांनी उपस्थित शिखांना मार्गदर्शनही केले. ते म्हणाले की, भारत सरकार नेहमीच शिखांच्या मागे उभे आहे. भारताने अफगाणिस्तानमधून शिखांना सुरक्षितपणे बाहेर काढले होते. भारताचे विदेशात रहाणार्या शिखांसमवेतचे संबंध कधीच तुटणारे नाहीत.
संपादकीय भूमिकाइतरांना फुकाचे सल्ले देणार्या अमेरिकेतील सुरक्षाव्यवस्था किती पोकळ आहे, हे या घटनेतून दिसून येते. यासाठी भारत सरकारने अमेरिका सरकारला जाब विचारणे आवश्यक ! |