मेरठ येथे १२ वीच्या विद्यार्थ्याला मारहाण करत तोंडावर करण्यात आली लघुशंका !

मेरठ (उत्तरप्रदेश) – येथे इयत्ता १२ वीतील एका विद्यार्थ्याला मारहाण करून त्याच्या तोंडावर लघुशंका केल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. या प्रकरणी पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ७ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवून एकाला अटक केली आहे. अवि शर्मा, आशिष मलिक, राज, मोहित ठाकूर आणि अन्य अशी गुन्हा नोंदवण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत.

मारहाण करणारे तरुण पीडित विद्यार्थ्याचे मित्र आहेत; पण त्यांच्यात कुठलाही वाद नाही, असे पीडित विद्यार्थ्याच्या कुटुंबियांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

विद्यार्थ्यांना नैतिक शिक्षण मिळत नसल्याचा आणि संस्कार होत नसल्याचाच हा परिणाम आहे !